ETV Bharat / city

दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी घरी नेण्यावरून शिक्षक संभ्रमात

राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या दहावीच्या परीक्षेला राज्यभरातून 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी, तर 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. १८ मार्च रोजी बारावीची परीक्षा झाली आहे आणि दहावीचा केवळ सामाजिक शास्त्र भाग-२ (भूगोल) या विषयाचा पेपर कोरोनामुळे पुढे ढकलला आहे.

answer sheet checking
उत्तरपत्रिका तपासणी
author img

By

Published : Mar 25, 2020, 7:42 AM IST

Updated : Mar 25, 2020, 8:35 AM IST

मुंबई - कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. असे असताना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका मंडळाच्या कॅब सेंटरमध्ये तपासण्याऐवजी शिक्षकांना ते घरी तपासण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयामुळे शिक्षक संभ्रमात सापडले आहेत. कोरोनामुळे राज्यात परिस्थिती बिघडत चालली असताना दुसरीकडे आता संचारबंदी सुरू आहे, अशात आम्ही हे पेपर घरी कसे घेऊन जायचे, असा सवाल शिक्षक संघटनांकडून उपस्थित करण्यात आला आहे.

हेही वाचा... ''गावाकडच्या लोकांनी कायदा हातात घेऊ नये, पोलिसांना त्यांचे काम करू द्या''

राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या दहावीच्या परीक्षेला राज्यभरातून 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी बसले आहेत. तर, 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे. बारावीची परीक्षा १८ मार्च रोजी संपली आहे. आता दहावीचा केवळ सामाजिक शास्त्र भाग-२ (भूगोल) या विषयाचा पेपर बाकी असून तो कोरोनामुळे पुढे ढकलला आहे. दहावी व बारावीच्या उत्तरपत्रिका मूल्यांकन व नियमन करण्यासाठी पूर्वी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकांच्या नावाने उत्तरपत्रिकांचे पार्सल पाठवण्यात येत होते. हे काम परीक्षक व नियामक म्हणून नेमणूक केलेले हे काम घरी करत असत. या पद्धतीमध्ये गोपनीयता राखली जात नव्हती व गैरप्रकार होण्याची शक्यता विचारात घेता राज्य मंडळाने कॅप सेंटरवरच पेपर तपासणी गेल्या काही वर्षापासून सुरू केली आहे.

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना, शिक्षक परिषद आदी संघटनानी दहावी-बारावीचे पेपर शिक्षकांना घरी तपासण्यासाठी देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्याला शालेय शिक्षणमंत्र्यांनी वेळीच प्रतिसाद दिला नाही. मात्र, आज राज्य शिक्षण मंडळाने उशिरा का असेना, दहावी-बारावीचे पेपर शिक्षकांना घरी तपासण्याचा निर्णय घेतला असून त्याचे शिक्षक संघटनांनी स्वागत केले आहे.

हेही वाचा... ऐतिहासिक निर्णय...टोकियो ऑलिम्पिक आता पुढच्या वर्षी

पेपर तपासण्यासाठी मंडळाने शिक्षकांना काही अटी घातल्या असून त्यात उत्तरपत्रिका परीक्षण व नियमानासाठी शिक्षकांना त्यांच्या घरुन तपासण्यास केवळ या परीक्षेपूर्ती अनुमती देण्यात येत आहे. उत्तरपत्रिका मोजून व सुस्थितीत असल्याची खातरजमा करुन शिक्षकांनी मुख्याध्यापकांकडून व कनिष्ठ महाविद्यालयाच्या संबंधित प्रमुखांकडून ताब्यात घ्याव्यात. उत्तरपत्रिकांचे परीक्षण व नियमन घरातून करताना त्याची पूर्णतः गोपनीयता व सुरक्षिता राखली जाईल, याची शिक्षकांनी दक्षता घ्यावी. उत्तरपत्रिकांचे परीक्षण/नियमन वेळेत पूर्ण करून त्या विहित पद्धतीने गोपनीयता व सुरक्षितता विचारात घेऊन त्या केंद्रातच हस्तांतरीत कराव्यात. आपल्याकडील उत्तरपत्रिका खराब होणार नाही अथवा गहाळ होणार नाही, याची दक्षता घ्यावी आदी अटींचा समावेश आहे.

Last Updated : Mar 25, 2020, 8:35 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.