ETV Bharat / city

कंगना - ऋतिक ई-मेल प्रकरण : अभिनेत्याला चौकशीसाठी मुंबई पोलिसांचे समन्स - Bollywood news

बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन व अभिनेत्री कंगना रणौत या दोघांमधील ई-मेल वादचा तपास मुंबई पोलिसांच्या एका विशेष पथकाकडून केला जात आहे. अभिनेता ऋतिक रोशन याच्याकडून 2016 मध्ये या संदर्भात मुंबई पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती.

Hrithik Roshan Kangana Ranaut E-mail case- Mumbai Police summons Hrithik Roshan for questioning
ऋतिक रोशन कंगना राणावत ई-मेल प्रकरण- ऋतिक रोशन ला चौकशीसाठी समन्स
author img

By

Published : Feb 25, 2021, 7:41 AM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन व अभिनेत्री कंगना रणौत या दोघांमधील ई-मेल वादचा तपास मुंबई पोलिसांच्या एका विशेष पथकाकडून केला जात आहे. अभिनेता ऋतिक रोशन याच्याकडून 2016 मध्ये या संदर्भात मुंबई पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर हा गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांच्या 'सीआययु'कडे देण्यात आलेला होता. या संदर्भात अधिक तपासासाठी आता अभिनेता ऋतिक रोशनला समन्स बजावण्यात आलेले आहे.

अभिनेता ऋतिक रोशन याने त्याच्या तक्रारीत म्हटले होते की बनावट ई-मेलच्या माध्यमातून कंगना रणौतला ई-मेल गेलेले आहे. मात्र कंगना रणौतला पाठवण्यात आलेल्या ई-मेल वरील मेल अॅड्रेस हा माझा नसून तो बनावट असल्याचा आरोप त्याने केला होता. मात्र हे मेल 2014 पासून ऋतिक रोशन याच्याकडून आपणास येत असल्याचा दावा कंगणाने केलेला आहे. यासंदर्भात अभिनेत्री कंगनाला 2016 मध्ये ऋतिक रोशनकडून कायदेशीर नोटीस देण्यात आलेली आहे. ऋतिक रोशनच्या दाव्यानुसार अभिनेत्री कंगना हिच्याकडून त्यास धमकीचे ई-मेल आले होते. 2016 मध्ये मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने ऋतिक रोशनचा लॅपटॉप व मोबाईल फोन तपासासाठी ताब्यात घेतला होता.

या प्रकरणाचा तपास केला जात असताना डिसेंबर 2020 मध्ये ऋतिक रोशनच्या वकिलांकडून मुंबई पोलिसांकडे विनंती करण्यात आली होती की या प्रकरणाचा तपास सायबर पोलिसांकडून मुंबई पोलिसांच्या सीआययूकडे देण्यात यावा, त्यानुसार हा तपास सीआययुकडे देण्यात आलेला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.