मुंबई: बाॅलीवु़ड स्टार शहारुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan ) कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी ( Cordelia cruise drugs case ) एनसीबीकडून क्लीन चिट देण्यात आली ( NCB Clean Cheat To Aryan Khan ) आहे. एनसीबीमार्फत मुंबई सत्र न्यायालयात आज दोषारोपपत्र सादर करण्यात ( Cruise Drug Case Charge sheet ) आले. ६ हजार पानांचे हे दोषारोपपत्र आहे. एकूण १० खंडांचे आरोपपत्र सादर करण्यात आले आहे.
आर्यनला चार प्रमुख मुद्यावर क्लीन चिट मिळाल्याचे समोर येत आहे. यात एनसीबीचे डीजी संजय सिंह यांनी सांगितले की, अरबाज मर्चंटने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की, त्याच्याकडून जप्त करण्यात आलेले ड्रग्ज आर्यन खानसाठी नव्हते. दुसरे कारण म्हणजे ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यानंतर आर्यनचे मेडिकल झाले नाही, त्यामुळे आर्यनने ड्रग्ज सेवन केले होते की नाही हे सिद्ध होऊ शकले नाही? अरबाजने आपल्या वक्तव्यात असेही म्हटले होते की, आर्यनने क्रूझवर ड्रग्ज घेऊन जाण्यास नकार दिला होता. आणि चौथे कारण म्हणजे आर्यनला ड्रग्जचा पुरवठा करण्याबाबत एकही ड्रग्ज तस्कर बोलला नव्हता. या चार प्रमुख कारणाच्या आधारावर आर्यनला क्लीन चिट मिळाल्याचे समोर ाले आहे.
हेही वाचा : Aryan Khan : आर्यन खानला कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून क्लीन चिट..