ETV Bharat / city

Walse Patil Meet Sharad Pawar : महाविकास आघाडीच्या आंदोलनानंतर गृहमंत्री वळसे पाटील आणि शरद पवार यांच्यात बैठक

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची त्यांच्या मुंबईच्या सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. काल नवाब मलिक यांना ईडीकडून अटक (Nawab Malik Arrest) करण्यात आली होती.

sharad pawar
राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार
author img

By

Published : Feb 24, 2022, 3:09 PM IST

मुंबई - राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची त्यांच्या मुंबईच्या सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. काल नवाब मलिक यांना ईडीकडून अटक (Nawab Malik Arrest) करण्यात आली असून, सत्र न्यायालयाने त्यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली. मात्र, त्याच प्रकरणात आज नवाब मलिक यांचे लहान भाऊ कप्तान मलिक यांना देखील ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली. ईडीकडून मलिक कुटुंबियांना आलेल्या दुसऱ्या नोटीसबाबत या भेटीमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून मंत्रालयाशेजारीच असलेल्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीनही पक्षांचे नेतेमंडळी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यासोबतच नवाब मलिक यांची मुलगी नीलोफर खान आणि त्यांचे भाऊ कप्तान मलिक हे देखील उपस्थित होते.

महाविकास आघाडी आणि भाजपचे आंदोलन -

महाविकास आघाडीने आज आक्रमक पवित्रा घेत मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात निदर्शने सुरू केली आहे. मुंबईत मंत्र्यांनी ही निदर्शने केली. राज्यात इतरत्रही ही निदर्शने करण्यात येत आहेत. (Agitation Against Arrest of Nawab Malik) तसेच भाजपनेही नवाब मलिक यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी राज्यात निदर्शने सुरू केली आहेत. दरम्यान, दाऊद इब्राहिम मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक यांना समन्स बजावले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.