मुंबई - राज्यात सध्या हॅलो की वंदे मातरम हा वाद Vande Mataram Issue जोरात सुरू आहे. आता यापुढे फोनवर बोलताना हॅलो ऐवजी वंदे मातरम बोलून पुढील संभाषणाला सुरुवात करायची. असा अध्यादेशच लवकरच सरकार तर्फे काढण्यात येईल, असे मंत्री सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar यांनी सांगितले. याला मुस्लिम संघटन असलेल्या रझा अकादमीने विरोध केला. आपल्या देशाचे ब्रीद वाक्य जय हिंद आहे. मग प्रश्न पडतो आपल ब्रीद वाक्य जय हिंद असताना मग वंदे मातरमचा अट्टाहास का तुम्हाला माहिती आहे का जय हिंद आणि वंदे मातरम हे दोन शब्द कुठून आले कसे आले आणि त्यांचा नेमका काय अर्थ होतो नाही वाचा हा रिपोर्ट.
जय हिंद शब्दाचा इतिहास : जय हिंद या घोषणेशिवाय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास अपूर्ण आहे. हा नारा देत अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी इंग्रजांच्या लाठ्या खाल्ल्या. हा नारा देत अनेक क्रांतिकारकांनी फासावर लटकले. पण, हा नारा कोणी दिला याचा कधी विचार केला आहे का? हा नारा सर्वप्रथम चेम्पक रमन पिल्लई यांनी दिला होता. डॉ. चेम्पक रमन पिल्लई यांनी 1907 मध्ये जय हिंद ही संज्ञा तयार केली, जी आबिद हसन सफारानी यांच्या सूचनेवरून 1940 च्या दशकात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या इंडियन नॅशनल आर्मीची घोषणा म्हणून स्वीकारली गेली. भारताच्या स्वातंत्र्यानंतर, जय हिंद हे भारताच राष्ट्रीय ब्रीद वाक्य म्हणून स्वीकारलं गेले. याचा आज देशाच्या सैन्यात मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे.
कोण आहेत डॉ. चेम्पक रमन पिल्लई? : पहिल्या महायुद्धादरम्यान पिल्लई यांनी स्वित्झर्लंडमधील झुरिच येथे आंतरराष्ट्रीय भारत समर्थक समितीची स्थापना केली. नंतर त्यांनी ते बर्लिन समितीत विलीन केले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणार्या युरोपमधील सर्व भारतीय-समर्थक क्रांतिकारी क्रियाकलापांसाठी ही मार्गदर्शक आणि नियंत्रण करणारी संस्था बनली. पिल्लई ही एकमेव अशी व्यक्ती होती ज्यांनी त्यावेळी हिटलरने भारतीयांबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याबद्दल लेखी माफी मागण्याचे धाडस केले होते. मात्र, चेम्पकरमन पिल्लई हे नाव देखील आज बहुतेक भारतीयांना अपरिचित वाटते ही शोकांतिका आहे.
वंदे मातरमचा इतिहास : भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम आहे आणि ते बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी संगीतबद्ध केले आहे. हे गाणे त्यांनी १८७५ मध्ये लिहिले, जे बंगाली आणि संस्कृतमध्ये होते. नंतर त्यांच्या आनंदमठ (1885) या प्रसिद्ध ग्रंथात ते जोडले. हे गाणे स्वातंत्र्य संग्रामातील लढवय्यांसाठी प्रेरणादायी गीत म्हणून उदयास आले. हे गीत सर्वप्रथम रवींद्रनाथ टागोर यांनी 1896 मध्ये काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनात गायले होते.
आनंदमठ प्रथम उल्लेख : तज्ज्ञ अरविंद वैद्य यांच्याशी संपर्क साधला व त्यांच्याकडून देखील काही माहिती जाणून घेतली. अरविंद वैद्य सांगतात की, जय हिंद हा शब्द आपण कसा घेतला आपल्याकडे कसा आला हे तर परिचित आहे. पण, वंदे मातरम या शब्दाचा प्रवास हा थोडा उलट सुलट होऊन आलेला आहे. म्हणजे बंकिमचंद्र चटर्जी यांनी जेव्हा आनंदमठ हे कादंबरी लिहिली त्यात वंदे मातरमचा उल्लेख आढळतो. आणि त्या कादंबरीतूनच हा शब्द पुढे आला, अशी माहिती अरविंद वैद्य यांनी दिली आहे. आता आनंदमठ जेव्हा तुम्ही लक्षात घेता त्यावेळी तुम्ही थोडी लेखकाची पार्श्वभूमी देखील लक्षात घेतली पाहिजे. त्या लेखकाने आपल्या पुस्तकात नेमकं काय लिहिले हे देखील लक्षात घेतलं पाहिजे. बँकिमचंद्र चॅटर्जी हे इंग्रजांच्या सैन्यातील एक अधिकारी होते आणि त्यातूनच ते निवृत्त झाले. त्यांनी जी कादंबरी लिहिले त्यात भारत हा देश एका मातेच्या रूपात दाखवला गेलाय. म्हणजे जसं काली, दुर्गा अगदी तशाच रूपात भारत ही एक माता आहे. अशा स्वरूपाचं वर्णन यामध्ये केल्याचा आढळतं. याच कादंबरीत या वंदे मातरमचा देखील उल्लेख आहे. म्हणजे यात हिंदू मूर्ती पूजा दाखवण्यात आली आहे, असेही वैद्य यांनी सांगितले.
हिंदू राष्ट्राची संकल्पना : या कादंबरीचा आणखी एक भाग असा आहे की, या कादंबरीत जे संन्याशी सांगितले गेले त्या संन्यासांचा प्रमुख तिथल्या लोकांना सांगतोय की, आपल्याला खरा धोका हा ब्रिटिशांपासून नाही. तर, मुस्लिमांपासून आहे. म्हणजे काय तर एकूणच या कादंबरीत हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडण्यात आले आहे. यावरून तुमच्या लक्षात येईल की काही ठराविकच लोक वंदे मातरमचा आग्रह धरताना दिसतील. आपण आनंदमठ मधील हे गीत राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले. मात्र, ते आपण पूर्णपणे स्वीकारलेलं नाही हे देखील तेवढेच नोंद घेण्यासारखा आहे. या गीतातील फक्त दोनच कडवी आपण राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारलेली आहेत. याचा उल्लेख करणे गरजेचे आहे, असेही अरविंद वैद्य म्हणाले.
हेही वाचा - Sudhir Mungantiwar आता सरकारी कर्मचाऱ्यांना हॅलो ऐवजी वंदे मातरमने करावी लागणार संभाषणाची सुरुवात