ETV Bharat / city

मुंबई उच्च न्यायालयाने अडसूळ यांची ईडी चौकशीविरोधातील याचिका फेटाळली - अडसूळ मुंबई उच्च न्यायालय याचिका

सिटी को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणात ईडीने केलेल्या चौकशीविरोधात शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे, अडसूळ यांना आता ई़डी चौकशीला समोर जावे लागणार आहे.

High Court dismissed Anandrao Adsul
अडसूळ यांची ईडी चौकशीविरोधातील याचिका फे
author img

By

Published : Oct 14, 2021, 3:05 PM IST

Updated : Oct 14, 2021, 4:30 PM IST

मुंबई - सिटी को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणात ईडीने केलेल्या चौकशीविरोधात शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे, अडसूळ यांना आता ई़डी चौकशीला समोर जावे लागणार आहे.

हेही वाचा - जे काही होईल ते कोर्टात समोर येईल, माझ्यावर दबाव टाकला जात आहे - समीर वानखडे

सिटी को - ऑपरेटिव्ह बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकरणात काही दिवसांपूर्वी ईडीने अडसूळ यांच्या मुंबई व अमरावती येथील घरी छापे टाकले होते. तसेच, चौकशीसाठी ईडीने अडसूळ यांना समन्स देखील बजावले होते. मात्र, प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले होते. दरम्यानच्या काळात अडसूळ यांनी ईडीच्या चौकशीविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. ईडीने पाठवलेले समन्स रद्द केले जावे, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली होती. त्यावर आज सुनावणी झाली. मात्र, अडसूळ यांची विनंती न्यायालयाने फेटाळली, तसेच मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्याची सूचना अडसूळ यांना केली.

आनंदराव अडसूळ अडचणीत

सिटी को - ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाकडून शिवसेनेचे माजी खासदार आनंद अडसूळ आणि त्यांचे पुत्र माजी आमदार अभिजीत यांना चौकशीचे समन्स बजावण्यात आले होते. तसेच, त्यांच्या कांदिवली येथील घर आणि कार्यालयातही ईडीने तपास केला होता. ईडीचे अधिकारी आनंद अडसूळ यांच्या घरी गेले होते. त्यांची चौकशी सुरू असताना अडसूळ यांची अचानक प्रकृती बिघडली होती. यानंतर त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र शिवसेना नेते आनंद अडसूळ यांनी ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करत अटकेपासून दिलासा देण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यालयात धाव घेतली होती.

हेही वाचा - महागाईच्या राक्षसाला २०२४ ला जाळणार - संजय राऊत

Last Updated : Oct 14, 2021, 4:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.