ETV Bharat / city

शासकीय सेवेतील दिव्यांगांना निवडणूकविषयक काम नाही

शासकीय सेवेत असलेल्या दिव्यांग व्यक्तींना निवडणुकीची कामे देण्यात येऊ नयेत, असे निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत.

शासकीय सेवेत असलेल्या दिव्यांग व्यक्तींना निवडणुकीची कामे देण्यात येऊ नयेत, असे निवडणूक आयोगाने निर्देश दिले
author img

By

Published : Sep 28, 2019, 6:33 PM IST

मुंबई - शासकीय सेवेत असलेल्या दिव्यांग व्यक्तींना निवडणुकीची कामे देण्यात येऊ नयेत, असे निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत.

हेही वाचा दिव्यांग शिक्षकांची सरकारला 11 सप्टेंबरपर्यंतची डेडलाईन; अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा

दिव्यांग व्यक्तींची व्याख्या 'इक्वल अपॉर्च्युनिटीज् प्रोटेक्शन ऑफ राईटस अँड फुल पार्टिसिपेशन, 1996' कायद्यात देण्यात आली आहे. त्यानुसार दिव्यांग अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना निवडणूकबाबत महत्त्वाचे आणि जोखमीचे काम देण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

हेही वाचा परभणी : दिव्यांग प्राण्यांना कृत्रीम अवयव प्रत्यर्पणाचा प्रयोग यशस्वी

दिव्यांगांसाठी तळमजल्यावर मतदान
अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींना निवडणूक प्रक्रियेमध्ये सामावून घेण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी मतदानाची व्यवस्था तळमजल्यावर करण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग व्यक्तींची मतदान केंद्रनिहाय माहिती संकलित करण्याचे काम जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांमार्फत सुरू आहे. मतदानासाठी येणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश आयोगामार्फत देण्यात आले आहेत.

Intro:Body:
mh_mum_vidhansabha_ec_ mumbai_7204684

शासकीय सेवेतील दिव्यांगांना

निवडणूकविषयक काम नाही

मुंबई: शासकीय सेवेत असलेल्या दिव्यांगांना निवडणूकविषयक काम शक्यतो देण्यात येऊ नये, असे निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत.

दिव्यांग व्यक्तीची व्याख्या 'इक्वल ॲपॉर्च्युनिटीज प्रोटेक्शन ऑफ राईटस अँड फुल पार्टिसिपेशन, 1996' मध्ये देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने दिव्यांग अधिकारी/ कर्मचाऱ्यांना निवडणूकबाबत महत्वाचे आणि जोखमीचे काम शक्यतो देण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

दिव्यांगांसाठी तळमजल्यावर मतदान

अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींना निवडणूक प्रक्रियेमध्ये सामावून घेणे आणि त्यांच्यात निवडणूकविषयक जागरुकता निर्माण करण्याचे काम सध्या सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणूकांमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी मतदानाची व्यवस्था तळमजल्यावर केली जाईल. त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्तींची मतदान केंद्रनिहाय माहिती संकलित करण्याचे काम जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांमार्फत केले जात आहे. मतदानासाठी येणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.