मुंबई : गुणरत्न सदावर्ते ( Advocate Gunratna Sadavarte ) यांना आणखी एक झटका बसला आहे. न्यायालयाने कोल्हापूर पोलिसांकडे त्यांचा ताबा देण्यास परवानगी ( Gunranta Sadavarte In Kolhapur Police Custody ) दिली असून, कोल्हापूर पोलीस त्यांना ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले आहेत. मराठा समाजाविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल ( Controversial Statement Against Maratha Community ) आहे. गिरगाव कोर्टाने कोल्हापूर पोलिसांना ताबा देण्याचा निर्णय दिला आहे. दरम्यान, कोल्हापूर पोलिस आर्थर रोडकडे रवाना झाले आहेत.
पोलिसांकडून पोलीस कोठडीची मागणी : दरम्यान, 'आम्ही पोलिस कोठडीची मागणी केली, दोन्ही बाजूनं युक्तीवाद झाला. सदावर्ते यांनी वकील केले नव्हते, म्हणून स्वत: युक्तीवाद केला, अशी माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली आहे. न्यायालयाने पोलिस कोठडीची गरज नसल्याचा निर्णय दिला. मात्र कोल्हापूर आणि इतर पोलिस सदावर्तेंचा ताबा घेण्यासाठी न्यायालयात आले आहेत. आता सत्र न्यायालयात सदावर्तेंनी जामीनासाठी अर्ज केला आहे. यात काय होते ते बघुयात. असेही घरत म्हणाले.
पैसे घेतल्याचं आलं समोर : मालमत्ताच्या चौकशीसाठी आम्ही पोलिस कोठडीची मागणी केली होती. त्यांच्याकडे पैसे मोजायचे मशीन, काही संशयास्पद कागदपत्र सापडले. यात एक हिरवे रजिस्टर होते. इतर काही कागदपत्र मिळाली. यावर सदावर्ते यांचा खुलासा आवश्यक होत्या. त्यांच्या दोन मालमत्ता, २३ लाखांची कार. यावर चौकशी करायची आहे. यावर सदावर्ते म्हणाले की, मी मालमत्ता आधीच घेतली आहे. मी कार घेऊ शकत नाही. मी पैसे फी म्हणून घेतले आहे. मात्र, सदावर्ते यांच्याकडून लेखी उत्तर घेतलं तेव्हा त्यांनी सांगितलं मी एकही पैसा कामगारांकडून घेतला नाही. मी मानद आॅनररी काम करतो. मात्र तपासात पैसे घेतल्याचं समोर आलं. त्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलली. आता ते म्हणतायत मी फी म्हणून पैसे घेतले. जयश्री पाटील ( Gunratna Sadavarte Wife Jayashree Patil ) सहआरोपी आहेत. २९ एप्रिल रोजी त्यावर सुनावणी होणार आहे.
हेही वाचा : गुणरत्न सदावर्ते यांच्या Max नावाच्या गाढवाची सोशल मीडियावर चर्चा, पाहा VIDEO