ETV Bharat / city

Gujarat CM Bhupendra Patel in Mumbai : गुजरातमध्ये गुंतवणूक करण्याचं उद्योजकांना मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचे आवाहन - व्हायब्रंट गुजरात समिट 2022

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आज मुंबई दौऱ्यावर (Gujarat CM Bhupendra Patel Mumbai Visit) आहेत. जानेवारी महिन्यात होणारा 10 वा 'व्हायब्रंट गुजरात' (10th edition of Vibrant Gujarat Global Summit 2022) या कार्यक्रमासाठी उद्योजकांना आमंत्रित करण्यासाठी ते मुंबईत आले आहेत.

Gujarat CM
गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी साधला उद्योजकांशी संवाद
author img

By

Published : Dec 2, 2021, 3:10 PM IST

Updated : Dec 2, 2021, 5:31 PM IST

मुंबई - गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आज मुंबई दौऱ्यावर (Gujarat CM Bhupendra Patel Mumbai Visit) आहेत. जानेवारी महिन्यात होणारा 10 वा 'व्हायब्रंट गुजरात' (10th edition of Vibrant Gujarat Global Summit 2022) या कार्यक्रमासाठी उद्योजकांना आमंत्रित करण्यासाठी ते मुंबईत आले आहेत. जनरल इलेक्ट्रिकचे अध्यक्ष महेश पळशीकर, टाटा कंपनीचे चेअरमन एन चंद्रशेखरन, कोटक बँक लिमिटेडचे सीईओ उदय कोटक, सन फार्माचे दिलीप संघवी, सिएट टायर कंपनीचे अनंत गोयंका, रिलायन्स इंडस्ट्रीजचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर निखिल मालवनी यांच्यासह इतर अनेक व्यावसायिकांची गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी भेट घेतली.

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा उद्योजकांशी संवाद

गुजरातमध्ये येण्यासाठी उद्योजकांना आमंत्रण -

यावेळी रोड शो म्हणून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच 10 ते 12 जानेवारी 2022 मध्ये होणाऱ्या व्हायब्रंट गुजरात या समिटमध्ये येण्याचे आमंत्रण या सर्व उद्योगपतींना भूपेंद्र पटेल यांच्याकडून देण्यात आले. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह अर्थमंत्री कनुभाई देसाई, उद्योग मंत्री जगदीश विश्वकर्मा आणि गुजरात राज्याचे मुख्य सचिव पंकज कुमार हेदेखील उपस्थित होते.

Gujarat CM
गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी साधला उद्योजकांशी संवाद

गुजरातमध्ये उद्योगांसाठी पोषक वातावरण -

या कार्यक्रमादरम्यान गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी उपस्थित असलेल्या सर्व उद्योजकांना गुजरातमध्ये येण्याचे आवाहन केले. गुजरातमध्ये उद्योगांसाठी पोषक वातावरण असून, 'इस ऑफ दोईंग बिझनेस' अंतर्गत पहिले उत्पादन नंतर परवानगी अशी योजना सुरु केली असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. तसेच कुठलाही देश किंवा राज्याच्या विकासासाठी राजकीय स्थैर्य हवे असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सबका साथ सबका विकास म्हणत अनेक टप्पे गुजरातने पूर्ण केले. दहा वर्षापूर्वी सुरू केलेल्या व्हायब्रंट समिटची सुरुवात करण्यात आली होती. त्यावेळी गुजरातमध्ये गुंतवणूक करण्याबाबत चर्चा होत होत्या. मात्र, आता आर्थिक गुंतवणुकीबरोबरच जागतिक समस्या आणि त्याचे समाधान याबाबतही विचार विनिमय होत असल्याचे यावेळी भूपेंद्र पटेल म्हणाले.

Last Updated : Dec 2, 2021, 5:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.