मुंबई - राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण बाधित होण्याचे प्रमाण वाढले होते. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिनाभरापूर्वी राज्यात लॉकडाऊन लागू केला. त्यात टप्प्याने वाढ करत तो १ जून पर्यंत वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊन काळात सध्या कोरोना रुग्णांचे बाधित होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे लॉकडाऊन अनलॉक होणार की आणखी यात वाढ होणार याबाबत नागरिकांना उत्सुकता आहे. मात्र, मुंबई पालकमंत्री अस्लम शेख यांनी लॉकडाऊन वाढण्याचे संकेत दिले आहेत.
कोरोनाची तिसरी लाट..
कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झाला नाही. त्यातच आता कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या लाटेचा लहान मुलांना आणि त्याचबरोबर युवकांना मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यासाठी मुंबईमध्ये आम्ही लहान मुलांसाठी विशेष कक्ष उभारत आहोत. कोरोनाच्या संभ्याव्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्याशी राज्यसरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची माहिती अस्लम शेख यांनी दिली.