मुंबई अशात सर्वांची नजर लागलेली असते ती मुंबईतील लालबाग परिसराकडे. कारण, गणपती आणि लालबाग या परिसराचे अतूट नाते आहे. दरम्यान याच लालबाग भागात मुंबईचा प्रसिद्ध असा लालबागचा राजा बसतो. त्यामुळे मुंबईतील या भागात मुंबईसह आजूबाजूच्या भागातील कानाकोपऱ्यातून लोक इथे येत आहेत. याच भागात अनेक मूर्तीशाळा असल्याने मुंबईतील अनेक प्रसिद्ध मंडळांच्या मुर्त्या Mumbai Ganesh Mandals याच भागातून जात असतात. रविवारी सुट्टीचे on Sunday औचित्य साधत अनेक मंडळांच्या गणपतींचा आगमन सोहळा Grand arrival of Bappas पार पडला. तब्बल 38 mandals are seated 38 मंडळाचे बाप्पा आता मखरात बसले आहेत.
तब्बल 38 मंडळांचे गणपती मखरात मिळालेल्या माहितीनुसार, रविवारच्या सुट्टीचे औचित्य साधत मुंबईतील तब्बल 38 मंडळांनी आपल्या बाप्पाचा आगमन सोहळा पार पाडला. म्हणजे तब्बल 38 मंडळाचे बाप्पा आता मखरात बसले आहेत. या मंडळांमध्ये फोर्टचा राजा, बीडीडी चाळीचा राजा, खेतवाडीच्या राजा, माझगावचा राजा, ताडदेवचा राजा, अंधेरीचा विघ्नहर्ता, अभ्युदय नगरचा राजा या मुंबईतील प्रसिद्ध मंडळांनी देखील आपला बाप्पा मखरात बसवला. त्यामुळे लालबाग परळ भागात असलेल्या मोठ्या मूर्ती शाळांसमोर लोकांची गर्दी झाली होती. बाप्पाची एक झलक आपल्या मोबाईलच्या कॅमेरात टिपण्यासाठी नागरीकांनी इथे मोठी गर्दी केली होती.
मंडळांशी संवाद मागची दोन वर्ष कोरोनामुळे सर्व काही बंद होते. आता दोन वर्षानंतर पुन्हा एकदा मोठ्या उत्साहात लोक दहीहंडी, गणपती उत्सव साजरा करत आहेत. या संदर्भात इथल्या गणपती मंडळांशी संवाद साधला असता या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन वर्षानंतर आपला सण आलाय. त्यामुळे सर्वांमध्येच उत्साह आहे. नेहमीप्रमाणे यावर्षी देखील काहीतरी एक सामाजिक संदेश देत आपले सामाजिक भान जपत, आम्ही गणपती उत्सव साजरा करतोय. लोकांनी देखील आपली काळजी घेऊन, तब्येतीची काळजी घेऊन, हा उत्सव साजरा करावा. आम्ही ज्या मंडळांशी संवाद साधला यातील काही मंडळे गेल्या 16 वर्षांपासुन सार्वजनिक गणपती उत्सव साजरा करत आहेत. तर, काही मंडळे 11 ते 13 वर्षांपासुन हा उत्सव साजरा करत आहेत.
या मंडळांच्या बाप्पाचे आगमन मिरा भाईंदरचा राजा, साकीनाक्याचा राजा, मुलुंडचा श्री, अंटोप हिलचा महाराजा, मुलुंडचा विघ्रहर्ता, ताडदेवचा राजा, डोंगरीचा राजा, ओम तांडव मित्र मंडळ खेतवाडी 10वी गल्ली, साकिनाक्याचा महाराजा, मिरा भाईंदरचा श्री, खेतवाडीचा मोरया, अंधेरीचा विघ्नहर्ता, अभ्युदयनगरचा राजा, उपनगरचा सम्राट अंधेरी, चंदनवाडी गोड गणपती, कोलभाट लेनचा राजा, धारावीचा गजवक्र, लोअर परळचा लाडका, फोर्टचा राजा,
बालगणेशचा बल्लाळेश्वर, माझगावचा मोरया, कुलाब्याचा सम्राट, सीपी टँकचा राजा, तकियावार्डचा राजा, चिराबाजाराचा इच्छापूर्ती, मुन्शी महलचा राजा, पहिला पारशीवाड्याचा धुंढीविनायक, कुंभारवाड्याचा गणराज, बीडीडी चाळचा राजा, परळचा मोरया, साईनाथनगरचा राजा नालासोपारा, कोकणचा राजा, परळचा विघ्नहर्ता, सुंदरबागचा राजा, अंधेरीचा विघ्नहर्ता, सांताक्रुझचा राजा, इच्छापूर्ती श्री गणेश परेरावाडी, मुंबईचा लाडका शुभंकर या मंडळामधील बाप्पांचे आगमन झाले आहे.