मुंबई - मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकं निघून गेल्यास पैसाच उरणार नाही मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असे वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी केले आहे. यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. कोश्यारींच्या या विधानावर चौफेर टीका सुरू आहे. यापूर्वी देखील राज्यपाल यांनी अनेकदा वादग्रस्त विधाने केल्यानंतर त्यांच्यावर टीका देखील झाली होती.
दीपक केसरकर यांनी म्हटले की, राज्यपालांचे वक्तव्य आज चर्चेचा विषय बनलेय. या पदावरील व्यक्तीबद्दल बोलू नये तसा शिरस्ता आहे. मुळात यांची भाषण अधिकारी लिहितात. राज्यपालांची भाषण लिहून देणाऱ्या विभागात सुधारणा होण्याची गरज आहे. त्यांना जे लिहून दिले जाते ते तेच वाचतात. मुंबईत पारसी, पंजाबी यांचेही तितकच योगदान आहे. मुंबईवर महालक्ष्मीचा आशिर्वाद आहे, काही लोकं फक्त लोटा घेऊन आले ते सोबत पैसा घेऊन आले नव्हते. पैसा त्यांनी इथे आल्यावर कमवला असे केसरकर म्हणाले.
माजी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर मी बोलणार नाही - राज्यपालांची भाषण लिहून देणाऱ्या विभागात सुधारणा होण्याची गरज आहे. त्यांना जे लिहून दिलं जातं ते तेच वाचतात. राज्यपालांवर केंद्र सरकारचे नियंत्रण असायला हवे मुख्यमंत्री सध्या दौऱ्यावर आहेत. ते आल्यावर त्यांची भेट घेतील. राज्यपालांच्या वाक्याशी मी काय कोणीही सहमत होणार नाही. आम्ही आमच्या पक्षातर्फे पत्र पाठवून याबद्दल भूमिका जाहीर करूच असे दीपक केसरकर म्हणाले. माजी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर मी बोलणार नाही. कुठल्याही वाक्याचे राजकारण करायचे नाही, असेही केसरकर यावेळी म्हणाले.
हेही वाचा - Governor and Controversy: वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिध्द आहेत राज्यपाल; पाहुया त्यांची विधाने