मुंबई - गुढीपाडवा म्हटलं की मुंबईकरांना सगळ्यात आधी आठवतं ते गिरगाव आणि इथला गुढीपाडवा. गुढीपाडवा जवळ आला की, यावर्षी नवं काय ? अशी गिरगावकरांमध्ये चर्चा असते. मात्र, मागची दोन वर्ष धोरणामुळे बंद असलेला हा 'हिंदू नववर्ष स्वागत सोहळा' यावर्षी देखील होणार का ? अशी चर्चा सध्या मुंबईकरांमध्ये आहे. यासंदर्भात मागील 20 वर्ष हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करणाऱ्या स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान या संस्थेशी केलेली बातचीत.
कार्याध्यक्षांनी दिली माहिती सोहळा होणारच पण...Etv शी बोलताना संस्थेचे कार्याध्यक्ष श्रीधर आगरकर म्हणाले की, "मागील वीस वर्षांपासून आम्ही हिंदू नव वर्ष स्वागत सोहळा अगदी उत्साहात साजरा करतोय. यात फक्त मुंबईतूनच नाही तर संपूर्ण राज्यातून हौशी लोक गिरगावात येत असतात. पण, मागची दोनवर्षे संपूर्ण जगावर आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे या सोहळ्याचं आयोजन करता आलं नाही. आता सर्व काही सुरळीत होतंय पण, अद्यापही असलेल्या निर्बंधांमुळे हा सोहळा पूर्वीसारखा मोठा न करता या वर्षी आम्ही तो बंदीस्त सभागृहात करणार आहोत."
प्रशासनाला पूर्ण सहकार्य
आगरकर पुढे बोलताना म्हणाले की, "अद्यापही या परिसरात कलम 144 लागू आहे. त्यामुळे आम्ही शासनाच्या कोणत्याही नियमांचं उल्लंघन करणार नाही. आम्ही सकाळी मंदिरात जाऊन पूजा आरती करू आणि त्यानंतर सभागृहात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातील."'
आझादी का अमृत महोत्सव' या वर्षीची थीम