मुंबई सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन Ganeshotsav 2022 झालंय. यावर्षी लोकांचा उत्साह तिप्पट आहे, असं म्हणायला हरकत नाही. कारण गेली दोन वर्षे गणेशोत्सव, कोरोना महामारीमुळे, घराच्या चार भिंतीत आणि फक्त घरातल्यांसोबत साजरा करावा लागला होता. त्यामुळे गेल्या दोन वर्षांची आणि यावर्षीची मिळून बाप्पाची तिप्पट सरबराई होताना दिसतेय. सेलिब्रिटींच्या घरीही सुंदर सजवटीसह बाप्पासाठी गोडधोड नैवेद्य दाखविला जातो. त्यातच बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक Ukdis Modak सुद्धा प्रसाद म्हणून दिले जात आहेत.
श्रद्धावर मराठमोळे संस्कार उकडीचे मोदक आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचे actress shraddhha kapoor अतूट नाते आहे. श्रद्धाच्या घरात मराठमोळं वातावरण आहे. वडिलांकडून जरी पंजाबी वारसा घेतला असला, तरी श्रद्धा कपूर पूर्णतः मराठी मुलगी आहे. तिची आई शिवानी कोल्हापुरे, अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेची बहिण आहे. तसेच त्यांचा मंगेशकर (लता,आशा, हृदयनाथ ई.) कुटुंबीयांशी नातेसंबंध आहेत. त्यामुळे साहजिकच श्रद्धा जास्त करून मराठी वातावरणात मोठी झाली. तिच्यावर बहुतांशी मराठमोळे संस्कार आहेत. आता श्रद्धा आणि उकडीचे मोदक यांचं नातं काय आहे, हे बघूया.
उकडीचे मोदक श्रद्धा चा 'विक पॉईंट' श्रद्धा कपूरच्या घरी दर वर्षी बाप्पाचे आगमन होते. श्रद्धा, तिचे वडील शक्ती कपूर, तिची आई शिवानी, भाऊ सिद्धार्थ गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करतात. मनोभावे पूजाअर्चा, आरती करतात. त्यांचे नातेवाईकही आवर्जून हजेरी लावतात. प्रसादासाठी बरेच प्रकार असले तरी उकडीचे मोदक असतातच. आणि उकडीचे मोदक श्रद्धा चा 'विक पॉईंट' Ukdis Modak Weak point of Shraddha Kapoor आहे. तिला ते इतके आवडतात की, ती ते कितीही खाऊ शकते. मागे श्रद्धा आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम सोबत गप्पा मारताना अस्खलित मराठीमध्ये बोलली होती की, "मला उकडीचे मोदक प्रचंड आवडतात. गरमागरम मोदक आणि त्यावर साजूक तुपाची धार. हे कॉम्बिनेशन म्हणजे स्वर्गीय आनंद. माझी आई अप्रतिम उकडीचे मोदक बनविते. मी मोदक खाताना माझ्या डाएट वगैरेला फाटा देते. वर्षभराची सर्व कसर मी भरून काढते."
यावर्षी श्रद्धा कपूरच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आणि पूजेनंतर तिने उकडीच्या मोदकांवर ताव मारला असणार हे निश्चित. Special relationship between Shraddha Kapoor and Ukdis Modak
हेही वाचा Ganesh Chaturthi Recipes गणेश चतुर्थी स्पेशल,ओल्या नारळाचे उकडीचे मोदक