ETV Bharat / city

सामान्यांच्या जीवाशी खेळ! आरोग्याला हानिकारक 1,418 किलो भेसळयुक्त खाद्यतेल जप्त - adulterated cooking oil case in Mumbai

भेसळखोरांकडून तेल विक्रीसाठी वापरलेल्या अस्वच्छ डब्यांचा (टिन) वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या भेसळयुक्त तेलाचे 7 नमुने एफडीएने ताब्यात घेतले आहे. यासंबंधीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती एफडीएचे सहआयुक्त, बृहन्मुंबई (अन्न) शशिकांत केकरे यांनी दिली आहे.

बनावट खाद्यतेल कारखान्यावर छापा
बनावट खाद्यतेल कारखान्यावर छापा
author img

By

Published : Nov 26, 2020, 5:29 PM IST

मुंबई - खाद्यतेल शुध्द असणे हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत गरजेचे असते. मात्र, भेसळखोर स्वार्थासाठी खाद्यतेलात भेसळ करत नागरिकांच्या जीवाशी खेळत असतात. ही भेसळ रोखण्यासाठी सणासुदीच्या काळात अन्न आणि औषध प्रशासनाकडून (एफडीए) विशेष मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत घाटकोपर पश्चिम येथून तब्बल 1 लाख 82 हजार 969 रुपये किमतीचे भेसळयुक्त तेल एफडीएने जप्त केले आहे. भेसळीचे 1,418 किलो तेलाची वापरलेल्या डब्यातून विक्री केली जात होती.

भेसळखोरांकडून तेल विक्रीसाठी वापरलेल्या अस्वच्छ डब्यांचा (टिन) वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या भेसळयुक्त तेलाचे 7 नमुने एफडीएने ताब्यात घेतले आहे. यासंबंधीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती एफडीएचे सहआयुक्त, बृहन्मुंबई (अन्न) शशिकांत केकरे यांनी दिली आहे.

हेही वाचा-दुधात भेसळ अन् शेतकऱ्यांवरील अन्याय खपवून घेणार नाही - दुग्धविकास मंत्री सुनील केदार

दिवाळीत भेसळखोर अधिक सक्रिय-
एफडीएकडून भेसळ रोखण्यासाठी नियमितपणे कारवाई होत असते. दिवाळीत भेसळखोर अधिक सक्रिय होतात. त्यामुळे एफडीएकडून दिवाळीत विशेष मोहीम राबवली जाते. त्यानुसार 10 नोव्हेंबरला एफडीएला मिळालेल्या माहितीनुसार अधिकाऱ्यांनी घाटकोपर पश्चिम येथील मेसर्स अंबिका ऑईल, शॉप नंबर 1/5/6, मौलाना चाळ, एलबीएस रोड येथे छापा टाकला. या छाप्यात त्यांनी 1 लाख 82 हजार 969 रुपये किमतीचा 1418.4 किलोचा तेलाचा साठा जप्त केला आहे.

हेही वाचा-नागपूर: ऐन दिवाळीत ५५३ किलो भेसळयुक्त खवा जप्त; पोलिसांसह अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई-
एफडीएच्या छाप्यात लायन ब्रँडचे 778.4 किलो वनस्पती तेल जप्त करण्यात आले. या तेलाची किंमत 88 हजार 218 रुपये इतकी आहे. तर बन्सीवाला ब्रॅण्डचे मोहरीचे 208.4 किलो तेल जप्त केले आहे. याची किंमत 27 हजार 994 रुपये आहे. संग्राम ब्रँडचे 343.4 किलो शेंगदाणा तेलही जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेले हे तेल 46 हजार 130 रुपये किमतीचे आहे. तर माली ब्रँडचे खोबऱ्याचे तेलही जप्त करण्यात आले आहे. हे तेल 88.4 किलो इतके असून त्याची किंमत 20 हजार 627 रुपये आहे. एफडीएने एकूण भेसळयुक्त 1,418 किलो तेल जप्त केले आहे. या तेलाची एकूण किंमत 1 लाख 82 हजार 969 रुपये अशी आहे. या तेलाचे 7 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या नमुन्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. पण ही भेसळखोरी पाहता ग्राहकांनी तेल खरेदी करताना काळजी घेणे गरजेचे असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

नागपूरमध्ये खाद्यतेलातील भेसळीचा झाला होता पर्दाफाश

गोड्या तेलात भेसळ केली जात असल्याच्या तक्रारी मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने नागपुरातील जेठानंद ट्रेडिंग कंपनी नामक तेलाच्या गोडाऊन वर छापा मारून लाखो रुपये किमतीचे भेसळयुक्त तेल जप्त केले आहे. एफडीएने ही कारवाई एप्रिल 2020 मध्ये केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.