ETV Bharat / city

Farmers Agitation : नवी मुंबईतील शेतकऱ्यांचे मुंबईत आंदोलन, शरद पवारांच्या घरी धडक देण्याचा इशारा - शरद पवारांच्या घरी धडक देण्याचा इशारा

नवी मुंबईतील भूमाफियाने जमिनी हडपल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज मुंबईत आंदोलन ( Navi Mumbai Farmers Agitation In Mumbai ) केले. सरकारने त्या भूमाफियावर १५ दिवसात कारवाई न केल्यास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरी धडक देण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी ( Warning To Protest Sharad Pawar House ) दिला.

Navi Mumbai Farmers Protest In Mumbai
नवी मुंबईतील शेतकऱ्यांचे मुंबईत आंदोलन
author img

By

Published : May 11, 2022, 5:00 PM IST

मुंबई- नवी मुंबईतील मराठा समाजातील शेतकऱ्यांच्या ( Navi Mumbai Maratha Farmers ) जमिनी भूमाफियाने हडपल्या आहेत. त्याच्या विरोधात वारंवार तक्रार करूनही कारवाई होत नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नवी मुंबईतील शेतकऱ्यांनी आज सकाळी मुंबईमधील फोर्ट परिसरातील दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन ( Navi Mumbai Farmers Agitation In Mumbai ) केले. दरम्यान, सरकारने १५ दिवसांत संबंधितांवर मोक्का अंतर्गत कारवाई न केल्यास, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या घरावर धडक ( Warning To Agitation Sharad Pawar House ) देऊ, असा पवित्रा घेतल्याची माहिती मराठा समन्वय समितीचे नेते अंकुश कदम यांनी दिली. असंख्य शेतकरी यावेळी आंदोलनात सामील झाले होते.

शेतकऱ्यांची निदर्शने : नवी मुंबईतील कोयना प्रकल्पग्रस्त ( Koyna project affected In Navi Mumbai ) मराठा समाजाच्या जमिनी भू माफिया बिल्डर उमेश उदाणी यांनी लाटल्या आहेत. जमिनी ताब्यात घेण्यासाठी अनेक शेतकऱ्यांवर खोट्या ॲट्रॉसिटीच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. आदिवासींसोबत आर्थिक व्यवहारकरून पोलीस आणि शासकीय प्रशासनातील जातीयवादी अधिकाऱ्यांना हाताशी धरून मराठा समाजातील शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. शिवाय गेले पन्नास वर्ष कसत असलेली जमीन ताब्यात घेऊन शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे. त्यामुळे आज ३० ते ३५ शेतकऱ्यांनी कुटुंब कबिल्यासह फोर्टमधील बाळासाहेबांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले. यावेळी राज्य सरकारने विरोधात घोषणा देण्यात आल्या. तसेच हातात फलक घेऊन, शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध नोंदवला.

Navi Mumbai Farmers Protest In Mumbai
नवी मुंबईतील शेतकऱ्यांचे मुंबईत आंदोलन

पवारांच्या घरावर धडक : शेतकऱ्यांवर अन्याय होत असून, याबाबत वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र भू माफिया उदाणी हे शरद पवार यांच्या जवळचे असल्याने कारवाई केली जात नाही, असा आरोप मराठा समन्वय समितीचे नेते अंकुश कदम यांनी केला आहे. तसेच संबंधित भू माफियावर १५ दिवसांत मोक्कांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी केली. राज्य सरकारने कारवाई न केल्यास राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या घरावर धडक देणार असल्याचा इशारा कदम यांनी दिला आहे.

हेही वाचा : Ajit Pawar Speech : अजित पवारांच्या भाषणावेळी कांदा उत्पादक शेतकरी बसले गळ्यात कांद्याच्या माळा घालून

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.