ETV Bharat / city

Exam Fever 2022 : पाचवी-आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २० जुलैला; नोंदणी अर्जाकरीता मुदत वाढ! - आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा २० जुलैला

Exam Fever 2022 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ( Maharashtra State Examination Council ) घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा ही 20 जुलै रोजी घेण्यात ( scholarship exam on 20 July ) येणार आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर करण्याबरोबरच परिषदेकडून विद्यार्थी व शाळांना नोंदणी अर्ज करण्यासाठी २३ ते ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ ( scholarship exam application date extended ) दिली आहे.

scholarship exam application date extended
आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा २० जुलैला
author img

By

Published : Apr 23, 2022, 4:44 PM IST

Exam Fever 2022 : मुंबई - विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची सवय व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ( Maharashtra State Examination Council ) शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. शैक्षणिक वर्ष 2022 मधील शिष्यवृर्ती परीक्षा ही 20 जुलै रोजी घेण्यात ( scholarship exam on 20 July ) येणार आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर करण्याबरोबरच परिषदेकडून विद्यार्थी व शाळांना नोंदणी अर्ज करण्यासाठी २३ ते ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ ( scholarship exam application date extended ) दिली आहे.

एकाच दिवशी होणार परीक्षा - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दर वर्षी इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीच्या अशा दोन्ही वर्गांमधील विद्यार्थ्यांकरिता असणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केले जाते. यंदा इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा २० जुलै रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. यापूर्वी ही परीक्षा २० फेब्रुवारी रोजी घेण्याचे निश्चित झाले होते. मात्र तांत्रिक अडचणीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राज्य परीक्षा परिषदेकडून नाव नोंदणी करण्यास २३ ते ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे त्यावेळी शुल्क न भरल्याने प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे अर्ज निश्चित करण्याची संधी मिळाली आहे.

शुल्क भरण्यासाठी मुभा - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी सांगितले की, वाढीव मुदतीमध्ये अर्ज भरणार्‍या विद्यार्थ्यांना २ मेपर्यंत शुल्क भरण्यासाठी मुभा दिली आहे. दरम्यान, ३० एप्रिलनंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज किंवा २ मेनंतर शुल्क भरता येणार नाही. अर्ज नोंदणीसंदर्भात राज्य परीक्षा परिषदेकडून www.mscepune.in आणि https://www.mscepuppss.in या संकेतस्थळांवर सविस्तर माहिती उपलब्ध असणार आहेत.

हेही वाचा - Exam Fever 2022 : नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा होणार ऑनलाइन आणि ऑफलाइन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.