मुंबई - आजपासून नवरात्री उत्सवला सुरुवात होत असून मुंबईमध्ये स्वर्गवासी प्रमोद महाजन क्रीडा संकुलावर दांडिया क्वीन फाल्गुनी पाठक यांचा दांडिया रंगणार आहे. करोनामुळे दोन वर्ष हा उत्सव पूर्णपणे बंद होता. परंतु, दोन वर्षानंतर नव तरुणाई सह असंख्य चाहते फाल्गुनी पाठक यांच्या गाण्यावर नाचण्यासाठी उस्तुक आहेत. फाल्गुनी पाठक यांनी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने प्रमोद महाजन क्रीडा संकुलात रंगीत तालीम केली. त्याप्रसंगी त्यांनी विविध गोष्टींवर बारकाईने लक्ष दिले. या रंगीत तालीम नंतर त्यांच्याशी खास बातचीत केली आहे, आमचे प्रतिनिधी संजय पिळणकर यांनी.
दोन वर्षांनी आयोजन होत आहे कसं बघता? - विशेष म्हणजे मागच्या दोन वर्षांपासून करोनामध्ये बऱ्याच लोकांना याचा फटका बसला आहे. परंतु, संगीत ही अशी एक जादू आहे का ते सर्वांमध्ये नवचैतन्य निर्माण करते. त्याचबरोबर नवरात्रीमध्ये नव देवींची गाणी गायल्याने एक नवीन स्फूर्ती भेटते व ही स्फूर्ती लोकांमध्ये जेव्हा जाते तेव्हा लोकांमध्ये नवचैतन्य निर्माण होते असे फाल्गुनी पाठक यांनी सांगितले आहे.
आजही लोकांना जुन्या गाण्यांवर थिरकायला आवडतं? संगीत अशी एक जादू आहे की ती सर्वांना आपलीशी वाटते. नव्वदच्या दशकातील गाणी असतील ती सुद्धा आज लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये आवडत आहेत. 28 वर्ष मी या क्षेत्रामध्ये आहे. परंतु, लोकांना नवसंगीत तसेच जुन्या गाण्यांमध्ये त्यांचा रस दिसून येत आहे.
तुम्ही वयाच्या आठव्या वर्षापासून गायनाला सुरुवात केली व आतापर्यंतचा प्रवास? - मी वयाच्या नव्या वर्षापासून गायनाला सुरुवात केली. मी दहा वर्षाची असताना अलका याग्निक यांच्याबरोबर माझे पहिले गुजराती गाणे रेकॉर्ड करण्यात आले. त्यानंतर मी मागे वळून पाहिले नाही. मला दांडियामध्ये गाण्याची फार मोठ्या प्रमाणामध्ये आवड असल्याने मी या क्षेत्राकडे मोठ्या प्रमाणामध्ये आकर्षित झाली. यामध्ये देवींची गाणी बोलायला मला फार आवडत असून या क्षेत्रात गाण्याचा विशेष करून दांडियामध्ये गाण्याचा आनंद हा वेगळाच असतो असही त्या म्हणाल्या आहेत.