मुंबई - मुंबई कुलाबा परिसरातील, कुलाबा संक्रमण शिबीर गणेशोत्सव मंडळ Colaba Transit Camp Ganeshotsav Mandal गेल्या 40 वर्षांपासून बाप्पाची प्रतिष्ठापना करत आहे. 'मुंबईचा कृपाळू' the Krupalu of Mumbai म्हणून मुंबईभर लौकिक या बाप्पाचा आहे. मात्र यावर्षी पहिल्यांदाच 18 फुटी पर्यावरण पूरक, अशा बाप्पाच्या मूर्तीची स्थापना या मंडळाकडून करण्यात आली आहे. मुर्तीकार राजन झाडे यांनी 'श्रीरामाची' प्रतिकृती या मूर्तीतून साकारली आहे. यावर्षी पहिल्यांदाच, खंडेरायाची पर्यावरण पूरक अशी 18 फुटी मूर्ती मंडळाकडून स्थापन Established of 18 feet eco friendly Bappa करण्यात आली. निसर्गाचा समतोल हा राखलाच गेला पाहिजे. सध्या जगभर सुरू असलेल्या; प्रदूषणाचा फटका मानवीजीवनाला बसत आहे. प्रत्येकानेच पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे, या संकल्पनेतून थेट बाप्पाच्या मूर्ती तिथूनच या मंडळाने पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. पीओपी ची एवढी मोठी मूर्ती बनवायला जवळपास दोन ते तीन महिने लागतात. मात्र केवळ कागदाच्या लगद्यापासून ही 18 फुटी मूर्ती तयार करण्यात आली आहे. मात्र पीओपी च्या मूर्ती पेक्षा अधिकची काळजी ही मूर्ती हाताळताना घ्यावी लागते.Ganeshotsav 2022
गेली दोन वर्ष कोरोनाच्या सावटात गेली आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करता आला नव्हता. मात्र यावर्षी निर्बंध मुक्त असा सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करता येत असल्याने, त्याचा आनंद सर्वांनाच आहे. मात्र हा आनंद साजरा करत असतांना, पर्यावरणाचा हार्स कुठे होणार नाही; याची काळजी आपल्या सर्वांनाच घेतली गेली पाहिजे. हाच संदेश या मूर्तीतून देण्यात आला आहे.Ganeshotsav 2022
हेही वाचा Ganesha Idol 66 kg Gold Jewellery मुंबईतील GSB सेवा मंडळाच्या बाप्पाला 66 किलो सोन्याची सजावट