मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी ईडीने मनी लॉड्रिंग प्रकरणी ( Money laundering case ) अटक केली. प्रिव्हेशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग कायद्याच्या ( Prevention of Money Laundering Act ) तरतुदीनुसार दंडनीय गुन्ह्यांमध्ये मलिकांचा सहभाग असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. ईडीच्या कोठडीनंतर मुंबई न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मलिक सध्या आर्थर रोड कारागृहात ( Arthur Road Prison ) आहेत. त्यांची कोठडीत आधी १८ एप्रिलपर्यंत वाढ केली होती. मलिकांच्या तात्काळ सुटकेची मागणी करणारा अंतरिम अर्ज विशेष मुंबई न्यायालयात करण्यात आला होता. न्यायालयाने तो फेटाळून लावत त्यांना अधिक चार दिवसांची कोठडी सुनावली होती. ही कोठडी उद्या संपत असताना आता ईडीने मलिक यांच्या विरोधात ५ हजार पानी दोषारोपपत्र दाखल केले आहे.
ईडीने न्यायालयात काय दावा केला होता ? : ईडीने मलिक यांना सत्र न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी ईडीच्यावतीने अनिल सिंह यांनी बाजू मांडली होती. दाऊद हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी आहे. त्याची अनेक ठिकाणी बेकायदा संपत्ती असून, 3 फेब्रुवारीला दाऊदविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हसिना पारकरच्या माध्यमातून दाऊद भारतातील व्यवहार करायचा. तिच्या माध्यमातून अनेक ठिकाणी संपत्ती गोळा करण्यात आली. हसिना पारकर आणि नवाब मलिक यांच्यात आर्थिक संबंध असून, तिच्याशी संबंधित मालमत्ता नवाब मलिक यांनी खरेदी केली. कुर्ला येथील मालमत्ता ही दाऊदच्या हस्तकांशी संबंधित होती. ती नवाब मलिकांच्या कुटुंबियांची मालकी असलेल्या कंपनीच्या नियंत्रणात आहे.
दाऊदच्या मालमत्तांशी संबंधित व्यवहार : दाऊदशी संबंधित सात ठिकाणच्या मालमत्तेचे नवाब मलिक हे मालक आहेत. दाऊद टोळीशी संबंधित मालमत्ता हसिना पारकरचा चालक सलीम पटेल याच्याकडून मलिक कुटुंबियांनी खरेदी केली. त्यामुळे हे प्रकरण आर्थिक गैरव्यवहाराचे असल्याचा दावा ईडीने केला आहे. दाऊद टोळीकडून अनेकांना धमकावून वादातील मालमत्ता बळकावण्यात आल्या होत्या. त्यातील एक पीडित असलेली मुनीरा प्लंबर यांची कुर्ला येथे तीन एकर जमीन होती. सध्या त्याची किंमत 300 कोटी रुपये आहे. ही जागा मलिक आणि हसिना पारकर यांनी बळकावल्याचा मुख्य आरोप आहे.
हेही वाचा : Ed's action : मंत्री नवाब मलिकांची मालमत्ता जप्त