मुंबई - एन्काऊंटर स्पेशलिस्ट दयानंतर उर्फ दया नायक यांची बदली करण्यात आली आहे. दया नायक यांची बदली गोंदिया जिल्ह्यात करण्यात आली. जुहू एटीएसचे (दहशतवाद विरोधी पथक) प्रमुख असलेले दया नायक यांची बदली गोंदिया जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती येथे करण्यात आली आहे.
यापूर्वी बदलीच्या ठिकाणी हजर न झाल्याने करण्यात आले होते निलंबन
यापूर्वीही दया नायक यांची बदली 2014 मध्ये नागपूर येथे करण्यात आली होती. मात्र, त्यांनी नागपूरचा चार्ज स्वीकारला नव्हता. याप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली होती. मनसूख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास एटीएस मार्फत करण्यात येत होता. याप्रकरणी एटीएस कारवाई देखील करत होते. प्रकरणाच्या तपासासाठी सहा पथके बनवल्या होत्या. या सहा पथके एटीएसच्या होत्या. त्यातील जूहू एटीएसचे प्रमुख म्हणून दया नायक काम पहात होते.
कोण आहेत दया नायक ?
- 1995 मध्ये दया नायक यांची महाराष्ट्र पोलीस दलात नियुक्ती
- 1998-99मध्ये दया नायक यांना एन्काऊंटर स्पेशलिस्ट म्हणून मिळाली ओळख
- प्रदीप शर्मा यांच्यासोबत दया नायक यांनी गुन्हे शाखेत काम केले
- दया नायक यांच्याकडे गोंदिया बदलीपूर्वी जुहू एटीएसची जबाबदारी
- नायक यांनी अनेक गुंडांचे एन्काऊंटर केले आहे
- दया नायक यांच्यावर अनेक आरोपही झाले आहेत
- 2004 मध्ये दया नायक यांची चौकशी करण्यात आली होती
- बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी नायक यांचे 2006 मध्ये झाले होते निलंबन
हेही वाचा - माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या तपासासाठी सीबीआयला मार्ग मोकळा - मुंबई उच्च न्यायालय