नवी दिल्ली - महाराष्ट्र विधान परिषदेच्या ९ जागांबाबत चर्चा करण्यासाठी आज भारतीय निवडणूक आयोग महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा हे या बैठकीमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होतील. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
-
महाराष्ट्र विधान परिषद की 9 रिक्त सीटों के चुनाव को लेकर भारत निर्वाचन आयोग की बैठक कल होगी। मुख्य चुनाव आयुक्त सुनील अरोड़ा वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिए बैठक में शामिल होंगे।
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">महाराष्ट्र विधान परिषद की 9 रिक्त सीटों के चुनाव को लेकर भारत निर्वाचन आयोग की बैठक कल होगी। मुख्य चुनाव आयुक्त सुनील अरोड़ा वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिए बैठक में शामिल होंगे।
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 30, 2020महाराष्ट्र विधान परिषद की 9 रिक्त सीटों के चुनाव को लेकर भारत निर्वाचन आयोग की बैठक कल होगी। मुख्य चुनाव आयुक्त सुनील अरोड़ा वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिए बैठक में शामिल होंगे।
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 30, 2020
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यासंदर्भात राज्यपालांनी काल निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त सदस्यपदी नियुक्ती करावी, अशी शिफारस महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी मंगळवारी राज्यपाल कोश्यारी यांना केली होती. त्यानंतर काल कोश्यारी यांनी निवडणूक जाहिर करण्याची विनंती केली. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करणार नसल्याचेच संकेत दिले असल्याचे मत व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्य विधिमंडळाच्या एकाही सभागृहाचे सदस्य नाहीत. मुख्यमंत्रीपद कायम ठेवण्यासाठी २७ मे पर्यंत त्यांना दोन्ही पैकी एका सभागृहाचे सदस्यत्व मिळणे आवश्यक आहे. यासोबतच, विधान परिषदेच्या 9 सदस्यांचा कालावधी 24 एप्रिल रोजी संपला आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यातच या रिक्त जागांसाठी निवडणूक होणे आवश्यक होते. मात्र, कोरोनाचा प्रादूर्भाव सुरु असल्यामुळे ही निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने पुढे ढकलली होती.
हेही वाचा : महाराष्ट्राचा वर्धापनदिन : पंतप्रधान मोदीही म्हणाले 'जय महाराष्ट्र'!