ETV Bharat / city

Sanjay Raut on EC : बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर निवडणूक आयोग प्रश्न उपस्थित करते हे धक्कादायक - संजय राऊत

बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray Shivsena) यांनी 56 वर्षांपूर्वी हिंदुत्वाचा (Shivsena Hindutva) विचार करून पक्षाची स्थापना केली आणि निवडणूक आयोग त्यांच्या पक्षावर प्रश्न उपस्थित करत आहे आणि हे महाराष्ट्रातील जनतेसाठी धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut on EC) यांनी दिली आहे.

sanjay raut
संजय राऊत
author img

By

Published : Jul 23, 2022, 4:34 PM IST

Updated : Jul 23, 2022, 4:57 PM IST

मुंबई - बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray Shivsena) यांनी 56 वर्षांपूर्वी हिंदुत्वाचा (Shivsena Hindutva) विचार करून पक्षाची स्थापना केली आणि निवडणूक आयोग त्यांच्या पक्षावर प्रश्न उपस्थित करत आहे आणि हे महाराष्ट्रातील जनतेसाठी धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut on EC) यांनी दिली आहे. तसेच दिल्लीला आमचा पक्ष नष्ट करायचा आहे. आज शिवसेनेचे एकमेव नेते उद्धव ठाकरे राहिले आहेत, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले. दरम्यान, राज्यातील सत्तानाट्यावर उद्धव ठाकरे यांची सडेतोड मुलाखत 26 आणि 27 जुलै रोजी 'सामना'वर प्रकाशित होणार आहे. संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे.

  • It's shocking for Maharashtra's people. Balasaheb Thackeray formed the party 56 yrs ago, thinking about Hindutva & EC is raising questions on his organisation. Delhi wants to destroy our party. Uddhav Thackeray is the only leader of Shiv Sena today: Sanjay Raut pic.twitter.com/a2NPpDVpMq

    — ANI (@ANI) July 23, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काय आहे प्रकरण - शिवसेनेवर आपला ताबा राहवा यासाठी एकनाथ शिंदे गटाकडून आता महत्त्वाच्या हालचाली करायला सुरुवात झाली आहे. शिवसेनेची ओळख असलेली त्यांची निशाणी धनुष्यबाण (bow and arrow symbol) याच्यावरच आता एकनाथ शिंदे गटाकडून दावा करण्यात आला आहे. मूळ शिवसेना आपणच असून शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण हे आपल्यालाच मिळावं यासाठी एकनाथ शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे. तर आमचे म्हणणे ऐकल्याशिवाय केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये अशी मागणी शिवसेनेकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली (Shiv Sena before Election Commission).

रस्सीखेच सुरू - सत्ता संघर्षपासून सुरू झालेली ही लढाई, आता पक्ष कोणाचा इथपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. धनुष्यबाण ही निशाणी आपल्याला मिळावी यासाठी आता एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. मात्र याबाबत येत्या 8 ऑगस्टला केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. दोन्ही बाजूने योग्य ती कागदपत्रे घेऊन आठ ऑगस्टला केंद्रीय निवडणूक आयोगापुढे दोन्ही पक्षाने उपस्थित राहण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे आठ ऑगस्टला धनुष्यबाण कोणाचा याबाबत निवडणूक आयोग निर्णय घेण्याची शक्यता आहे.

निशाणी शिवसेनेची ओळख - शिवसेनेला धनुष्यबाण ही निशाणी 19 ऑगस्ट 1989 साली केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देण्यात आली होती. राज्यभरातच नाही तर, देशभरात शिवसेनेची निशाणी धनुष्यबाण पोहोचवली. धनुष्यबाण ही निशाणी शिवसेनेची ओळख आहे. त्यामुळे धनुष्यबान निशाणी ज्या गटाकडे जाईल तोच पक्ष अधिकृत शिवसेना म्हणून गणला जाईल. त्यामुळे एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात धनुष्यबाण चिन्हा साठी आता कायदेशीर लढाई सुरू झाली आहे.

हेही वाचा - MH Political Crisis : धनुष्यबाण चिन्हासाठी एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे निवडणूक आयोगासमोर आमनेसामने

Last Updated : Jul 23, 2022, 4:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.