ETV Bharat / city

Devendra Fadnavis CM Post : देवेंद्र फडणवीस यांना नाईलाजास्तव मुख्यमंत्री पद सोडावं लागलं का? जाणून घ्या.. - Devendra Fadnavis deputy chief minister

अनपेक्षित झालेल्या सत्तेच्या उलथापालथीमध्ये ( Devendra Fadnavis left cm post ) सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली ती भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी. देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis deputy chief minister ) हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील व एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, असे सर्वांना वाटत होते. परंतु, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील असे सांगत देवेंद्र फडवणीस ( Devendra Fadnavis latest news ) यांनी भाजपला नाही, तर उभ्या महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का दिला. त्यांनी नाईलाजस्तव हे पद सोडले का? जाणून घ्या.

Devendra Fadnavis cm post
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Jul 2, 2022, 10:37 AM IST

मुंबई - उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर ( Devendra Fadnavis left cm post ) मागील दहा दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्ता संघर्षाचा शेवट झाला, असे सर्वांना वाटले. बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाने केलेल्या बंडखोरीमुळे ( Devendra Fadnavis deputy chief minister ) राज्यातील सत्तापालट झाला यात काही शंका नाही. परंतु, या अनपेक्षित झालेल्या सत्तेच्या उलथापालथीमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली ती भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी. भाजपला नव्हे तर सर्वांना माहीत होते की, आता मी पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis latest news ) हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील व एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री. परंतु, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील असे सांगत देवेंद्र फडवणीस यांनी भाजपला नाही, तर उभ्या महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का दिला.

हेही वाचा - विधानसभा विरोधीपक्ष नेत्याच्या बाकावर कोण बसणार..?

सत्ता स्थापनेत महत्त्वाची भूमिका - २०१४ ते २०१९ या काळात सक्षमपणे मुख्यमंत्र्यांची भूमिका बजावणारे देवेंद्र फडवणीस यांनी २०१९ मध्ये सुद्धा शिवसेनेसोबत बहुमताने सरकार स्थापनेची तयारी केली होती. मात्र, अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदावरून झालेल्या खटाटोपानंतर शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन केल्याने भाजपला विरोधात बसावे लागले होते. स्वतः देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते होते. विरोधी पक्षात बसावे लागले तरी सुद्धा मागील अडीच वर्षांच्या काळात विरोधी पक्षाची भूमिका निभावत असताना त्यांनी सक्षमपणे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवर सातत्याने रोखठोक भूमिका विधान भवनात, तसेच रस्त्यांवर संघर्षात मांडली.

आत्ताच झालेल्या राज्यसभा व विधान परिषदेच्या निवडणुकीमध्येही आपल्या चाणक्य नीतीने भाजपच्या तिन्ही खासदार व पाच आमदारांचा विजय खेचून आणला. राज्यात सध्या एक नंबरचे नेते म्हणून गणले जाणारे देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे गटाला आपल्यासोबत आणण्यात सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावली. देवेंद्र फडणवीस हे मुख्य सूत्रधार होते. अशा परिस्थितीत त्यांना मुख्यमंत्रिपद मिळेल यात काही शंका नव्हती.

नाईलाजास्तव मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं? - जर देवेंद्र फडणीस मुख्यमंत्री झाले असते तर मी पुन्हा येईन, असे सांगितल्या कारणाने आता ज्या पद्धतीने सध्या राज्यामध्ये सरकार स्थापन झाले आहे ते पाहता शिंदे गटाच्या बंडखोरीमागे तेच महत्त्वाचे सूत्रधार असल्याचे चित्र राज्यातच नाही तर देशात गेले असते. त्याचबरोबर, एकनाथ शिंदे गट नाराज झाला असता व त्यांच्या गटातील आमदार पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे परतण्याची भीतीही राहिली असती.

या अगोदरही देवेंद्र फडवणीस यांनी बऱ्याचदा आम्ही विधानसभा २०२४ ची तयारी करत आहोत. २०२४ पर्यंत आम्ही विरोधात बसणार, अशा पद्धतीचे भाष्य केले होते. आता अचानक झालेल्या या सत्तापालटामध्ये अडीच वर्षांसाठी भाजपला ही लॉटरी लागली आहे. अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे गटाला खुश ठेवून येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेसह इतर महापालिकेतसुद्धा सत्ता काबीज करण्याची मंशा भाजपची आहे. म्हणूनच इच्छा नसतानाही नाईलाजास्तव देवेंद्र फडवणीस यांना मुख्यमंत्री पदावर पाणी सोडावे लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा - Shridhar Patankar relief : श्रीधर पाटणकर यांना सीबीआय कोर्टाचा मोठा दिलासा, फसवणूक प्रकरणी तपास बंद करण्याची परवानगी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.