मुंबई - महाशिवरात्रीच्या निमित्ताने साकीनाका येथे ऐराणी रस्त्यावरील प्राचीन जंगलेश्वर महादेव मंदिरामध्ये शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केली आहे. मंदिरात पूजा व दर्शन घेण्यासाठी भक्तांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.
भक्त गायीचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक करत आहेत. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप देतात. त्यानंतर धोत्रा आणि बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात.
जंगलेश्वर मंदिराची अख्यायिका
काही वर्षांपूर्वी साकीनाका परिसरातील खैराणी येथे मोठे जंगल होते. या जंगलात शिव प्रकटले. यानंतर येथील सुर्वे नामक शिवभक्ताने या महादेव मंदिराची स्थापना केली. गेल्या 55 वर्षांपासून या मंदिरामध्ये महाशिवरात्री व इतर दिवशी पूजा-पाठ, होम-हवन करण्यात येते.