ETV Bharat / city

'गुपकर आघाडीत काँग्रेसचा सहभाग; जम्मू-काश्मीरमध्ये 370 कलम लागू होणार नाही'

काही भारतविरोधी शक्ती काही पक्षांशी हातमिळवणी करून हे कलम पुन्हा लागू करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गुपकर ग्रुपमध्ये आता काँग्रेसही समाविष्ट झाली असल्याचे म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काश्मीरमधील आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

fadnavis
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Nov 18, 2020, 7:28 PM IST

Updated : Nov 18, 2020, 10:21 PM IST

मुंबई - देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ३७० कलम ७० वर्षापेक्षा जास्त संघर्ष झाल्यावर रद्द करण्यात आले. यशस्वीपणे तिथले जनजीवन पूर्वपदावर आले आहे. अशा परिस्थितीत काही भारतविरोधी शक्ती काही पक्षांशी हातमिळवणी करून हे कलम पुन्हा लागू करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गुपकर ग्रुपमध्ये आता काँग्रेसही समाविष्ट झाली असल्याचे म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काश्मीरमधील आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये गुपकर आघाडी ही राष्ट्रविरोधी आघाडी कार्यरत असून या आघाडीचा आम्ही निषेध करतो, असे फडणवीस म्हणाले.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

काँग्रेसचा खरा चेहरा समोर

चीनच्या मदतीने देशात ३७० कलम पुन्हा लागू करण्यात यावे असे फारुख अब्दुल्ला व मेहबूबा मुफ्ती बोलत आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेस जात असेल तर आम्ही रोज काँग्रेसला प्रश्न विचारू व देशासमोर काँग्रेसला उघडे पाडण्याचे काम करू. आता काहीही झाले तरी देशात ३७० कलम रद्द होऊ शकत नाही, असे फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच भारत अस्थिर करण्यासाठी या सर्व गोष्टी जाणून बुजून केल्या जात आहेत. हे सर्व देशविरोधी कार्यवाही करणाऱ्या पक्षांचे एजंट म्हणून काम करतात, त्यांच्यासोबत काँग्रेसने जाऊ नये, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

वीजबिल प्रश्नावरून ठाकरे सरकारवर हल्ला

वीजबिल संदर्भात ऊर्जा मंत्री नितीन राऊत चुकीची आकडेवारी देत आहेत. आपले अपयश लपण्यासाठी हे सर्व करत आहेत. पूर्ण कोरोना काळात सरकारने जनतेला कुठलीही मदत दिली नाही, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा - मुंबई पोलिसांचं पुढचं पाऊल; पेट्रोलिंगसाठी 'क्यूआर कोड'चा वापर

हेही वाचा - ...तरच घोषणा करा; वीजबिलप्रश्नी फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा

Last Updated : Nov 18, 2020, 10:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.