मुंबई - देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील अमिताभ बच्चन असल्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा आणि आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे. यावर मी अमिताभ बच्चन नाही, माझ्या शरीरामुळे मी अमजद खान दिसतो असे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
फडणवीस राजकारणातील अमिताभ बच्चन मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मुंबई अध्यक्ष पदावर ऍडव्होकेट आशिष शेलार यांची नियुक्ती केली आहे. तसेच माजी मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांची राज्यात मंत्री पदावर नियुक्ती झाली आहे आहे. या पार्श्वभूमीवर या दोघांचा सत्कार आणि भाजपचा संकल्प मेळावा षण्मुखानंद हॉल, माटुंगा येथे संपन्न झाला. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी फडणवीस यांना राजकारणातील अमिताभ बच्चन म्हटले आहे. त्याचप्रमाणे आशिष शेलार यांनीही फडणवीस यांना अमिताभ बच्चन म्हटले आहे.
शरीरामुळे मी अमजद खान दिसतो मंगलप्रभात लोढा आणि आशिष शेलार यांनी मला अमिताभ बच्चन म्हटले असले तरी माझ्या शरीरामुळे मी अमजद खान दिसतो असे फडणवीस म्हणाले. यामुळे सभागृहात एकाच हसा पसरला. याच वेळी कितने आदमी थे असा आवाज मागून आल्यावर मी तितकेच विचारू शकतो असे म्हणत कितने आदमी थे, ५० निकल गये अभी २ ही बचे है असा टोला शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना लगावला. ते दोघेच असले तरी आम्ही विरोधकांचा सन्मान करतो असे फडणवीस म्हणाले.
हेही वाचा - Devendra Fadnavis उद्धव ठाकरेंनी केलेला भ्रष्टाचार मुंबईकरांसमोर मांडा, देवेंद्र फडणवीसांचा निशाणा