ETV Bharat / city

Devendra Fadnavis : पंतप्रधानांनी बोलावलेल्या बैठकीला देवेंद्र फडणवीस रवाना - Prime Minister

Devendra Fadnavis: या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) हे उपस्थित राहणार नाही. आज सकाळी 9 वाजेच्या दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) हे या बैठकीसाठी दिल्ली दौऱ्यावर निघाले आहेत.

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Jul 24, 2022, 10:50 AM IST

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपशासित राज्यांमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. ही बैठक आज सायंकाळी दिल्लीत पार पडणार आहे. मात्र, या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) हे उपस्थित राहणार नाही. आज सकाळी 9 वाजेच्या दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) हे या बैठकीसाठी दिल्ली दौऱ्यावर निघाले आहेत.

राजकीय वर्तुळात चर्चा - महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर नव्यानेच एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाचे सरकार प्रस्थापित झाला आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेल्या बैठकीत जाणार आहेत. आज बोलावलेल्या भाजपशासित राज्यातील आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या बैठकीतून घेणार आहेत. त्यातच नव्याने आलेल्या महाराष्ट्रात एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारनंतर महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीवर देखील चर्चा करण्याची शक्यता आहे.

तसेच अद्यापही राज्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. भारतीय जनता पक्षाच्या जेष्ठ नेत्यांकडून अद्यापही मंत्रिमंडळ विस्ताराला अजून दुजोरा न दिल्याने मंत्रिमंडळ विस्तार अद्यापही रखडलेला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत देखील बैठकीनंतर पंतप्रधानांशी देवेंद्र फडणवीस यांची चर्चा होण्याची शक्यता आहे.

नव्या सरकारवर टीका - मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री गेल्याच आठवड्यात दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली होती. या भेटीतही मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली आहे. होणाऱ्या दौऱ्यात मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. या मुद्याबाबत देखील या भेटीदरम्यान चर्चेची शक्यता नाकारता येत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन पंधरा दिवस उलटले असले तरी, अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने विरोधकांकडून सातत्याने नव्या सरकारवर टीका होत आहे.

हेही वाचा - Maharashtra Breaking : आमच्या लाऊडस्पीकरपुढे तुमच्या पिपाण्या टिकणार नाहीत-संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.