मुंबई - कोल्हापुरातील एका तरुणाने राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासंदर्भात फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याला घरी जाऊन बदडल्याची घटना घडली आहे.
संबंधित तरुणाला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेच्या कार्यकर्त्यांनी बदडल्यानंतर माफी मागण्यास सांगितले. तरूणाने माफी मागितल्यानंतर त्याला उठाबशा काढून फेसबूक अकाउंट डिलीट करण्यास भाग पाडले. तसेच त्याचा मोबाईल काढून घ्या, अशी समज त्याच्या घरच्यांना देण्यात आली आहे. याबाबतचा व्हिडीओ राष्ट्रावादी पक्षाच्या अधिकृत फेसबूकवस पोस्ट करण्यात आला आहे.