ETV Bharat / city

शेतकऱ्यांना फसविणाऱ्या विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करा- अजित पवारांचे निर्देश - उपमुख्यमंत्री अजित पवार

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या विविध प्रश्नांसंबधी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar on Soybean issues) म्हणाले, की सोयाबीन, कापूस उत्पादकांसह राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्यसरकार ठामपणे उभे आहे. केंद्रसरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या सोयाबीनसह कापसाच्या प्रश्नांसंबधी राज्यसरकारचे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार आहेत.

अजित पवारांचे निर्देश
अजित पवारांचे निर्देश
author img

By

Published : Nov 24, 2021, 8:00 PM IST

Updated : Nov 24, 2021, 8:16 PM IST

मुंबई - पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. ज्या विमा कंपन्या खोटे रेकॉर्ड तयार करुन शेतकऱ्यांना फसवत (insurance companies cheating farmers) आहेत, अशा विमा कंपन्यांवर तात्काळ गुन्हे नोंद करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. ते मंत्रालयातील बैठकीनंतर बोलत होते. सोयाबीनसह कापसाच्या प्रश्नांसंबधी राज्य सरकारचे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या (issues of Soybean and cotton producing farmers) विविध प्रश्नांसंबधी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, की सोयाबीन, कापूस उत्पादकांसह राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्यसरकार ठामपणे उभे आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या सोयाबीनसह कापसाच्या प्रश्नांसंबधी राज्यसरकारचे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार आहेत. संसदेच्या आगामी अधिवेशनात महाविकास आघाडीचे खासदार यासंबंधीचे प्रश्न सभागृहात मांडतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

शेतकऱ्यांना फसविणाऱ्या विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करा

हेही वाचा-ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ, परिवहनमंत्र्यांची माहिती

शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत बँकांनी रोखू नये-
राज्यातील अतिवृष्टी बाधितांना राज्य सरकारच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या मदतीचे वाटप सुरू आहे. त्याला गती देण्यात येईल. शेतकऱ्यांना दिलेले अनुदान तसेच आर्थिक मदत कोणत्याही परिस्थितीत बँकांनी रोखू नये. ही रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात येऊ नये, याबाबतच्या सूचना संबंधित बँकांना देण्यात येतील.

हेही वाचा-Kolhapur Election सतेज पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना माहिती लपवली - धनंजय महाडीक

राज्य सरकार राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे
नदीकाठच्या खरडून गेलेल्या जमिनी तयार करण्यासाठी रोजगार हमी योजनेसह ‘सीएसआर’ फंडातून मदत करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. कृषीपंपांना दिवसा सुरळीत आणि पुरेसा वीजपुरवठा करण्यासाठी राज्य सरकारने सौरपंपाची योजना आणली आहे. ही योजना अधिक सक्षमपणे राबविण्यात यावी. कर्जमाफीला पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात (Ajit Pawar on loan waiver scheme) कर्जमाफीची रक्कम जमा करण्याचे काम सुरू आहे. राज्य सरकार राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

हेही वाचा-Corona Third Wave : महाराष्ट्रात तिसरी लाट आली तर, सौम्य स्वरूपाची असेल - राजेश टोपे

तेलबिया साठवणीसंदर्भात मर्यादा असणार नाहीत-

तेलबिया साठवणेसंदर्भात मर्यादा असणार नाहीत, असा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दोन लाखापर्यंतचे कर्ज येत्या मार्च महिन्यापर्यंत माफ केले जाईल. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल, असे आश्वासन कृषीमंत्री दादा भुसे (Agri Minister Dada Bhuse on Jyotirao Phule loan waiver scheme) यांच्याकडून देण्यात आले.

बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (व्हिसीद्वारे), स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, तसेच विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Last Updated : Nov 24, 2021, 8:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.