ETV Bharat / city

Ajit Pawar Mumbai : 'सरकार अजून शाबूत, प्रत्येक मंत्र्यांनी आपल्या खात्याचे निर्णय घेतले' - उपमुख्यमंत्री अजित पवार

सरकारने अद्याप अस्तित्वात आहे. अर्थमंत्री म्हणून आपण या वर्षीच बजेट सादर केले होते. त्यानुसार बचत खात्याला त्याचा निधी वाटप केला जातो. त्या खात्याचे मंत्री आपल्या अधिकारानुसार ते निर्णय घेत असतात. त्यानुसारच प्रत्येक खात्याच्या मंत्र्याने आपल्या खात्यात बाबतचे अधिकार वापरत निर्णय घेतले आहेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar ) यांनी सांगितले आहे.

Ajit Pawar Mumbai
Ajit Pawar Mumbai
author img

By

Published : Jun 24, 2022, 7:30 PM IST

मुंबई - महाविकास आघाडी सरकार पडणार आहे हे लक्षात येतात आघाडी सरकारने दोन दिवसांत 106 निर्णय घेतले आहेत. यातून मोठ्या प्रमाणात निधी वळवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. मात्र या आरोपाचे खंडन उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar ) यांनी केले आहे. सरकारने अद्याप अस्तित्वात आहे. अर्थमंत्री म्हणून आपण या वर्षीच बजेट सादर केले होते. त्यानुसार बचत खात्याला त्याचा निधी वाटप केला जातो. त्या खात्याचे मंत्री आपल्या अधिकारानुसार ते निर्णय घेत असतात. त्यानुसारच प्रत्येक खात्याच्या मंत्र्याने आपल्या खात्यात बाबतचे अधिकार वापरत निर्णय घेतले आहेत. काही आमदारांनी बंद केले असले तरी मंत्रिमंडळात अद्याप शाबूत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड असे सर्वच नेते आपल्या खात्याचे निर्णय घेत असल्याचे स्पष्टीकरण विरोधकांच्या आरोपावर अजित पवार यांनी दिला आहे.

'मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी राष्ट्रवादी ठाम उभी राहणार' : मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी रहायचं आणि सरकार टिकवायचं ही काल आणि पुढेपण पक्षाची भूमिका राहणार असल्याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना आज केला. विधीमंडळाचे जे काही कामकाज आहे त्याबद्दलचा निर्णय विधानमंडळाचे अध्यक्ष घेतील कारण त्यामध्ये सरकार म्हणून बोलण्याचा काडीचाही अधिकार नाही असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. गुवाहटीला जे आमदार गेले आहेत ते शिवसेनेचे आहोत असे सांगत आहेत त्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष मिळून बहुमत आहेच शिवाय ते शिवसेनेचे आहेत तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच आहेत असेही अजित पवार यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

'सदस्यत्व रद्द करणे हा अध्यक्षांचा अधिकार' : बंडखोर आमदारांची पैकी 12 आमदारांचा सदस्यत्व रद्द करण्याबाबत शिवसेनेने मागणी केली आहे. मात्र त्यांचे सदस्यत्व रद्द करायचं का नाही? याबाबत सर्वस्वी अधिकार विधानसभेच्या अध्यक्षांना असतात. सध्या विधानसभा अध्यक्ष नसल्याने विधानसभेचे उपाध्यक्ष याबाबत निर्णय घेतील. सरकार म्हणून आपण त्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, असे स्पष्टीकरण बारा सदस्याच्या सदस्यत्व रद्दतेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.

हेही वाचा - Uddhav Thackeray : भाजपाने कूटनीती केली, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचे का - उद्धव ठाकरे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.