ETV Bharat / city

Ganeshotsav 2022 गणपती सजावटीसाठी कापडी मखरांना मागणी, बाजारांमध्ये सामान खरेदीसाठी भाविकांची गर्दी

गणेशोत्सव आता काही अवघ्या दिवसांवर येऊन ठेपला आहे. या निमित्ताने मुंबईतील लालबाग परळ इथल्या बाजारांमध्ये खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे Ganapati decoration . पर्यावरण पूरक कापडी मखरांना भावीक आता पसंती देताना दिसत Ganeshotsav 2022 आहेत.

author img

By

Published : Aug 20, 2022, 5:47 PM IST

Updated : Aug 24, 2022, 5:24 PM IST

Ganpati Festival 2022
Ganpati Festival 2022

मुंबई गणेशोत्सवासाठी हळूहळू मुंबई सज्ज होऊ लागली आहे Ganpati Festival . सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडप आणि डेकोरेशन करण्याचे काम आता सुरू झाले Ganeshotsav 2022 आहे. तर घरगूती गणेशोत्सवासाठी सजावट आणि आरास यांचे साहित्य खरेदीला बाजार गजबजू लागला आहे Ganpati Festival Shopping. मुंबईतील लालबाग परळ येथील बाजारामध्ये Devotee Crowed in Lalbagh Paral Market मोठ्या प्रमाणात ग्राहक गर्दी करताना दिसत आहेत.

पर्यावरण पूरक मखरांकडे ग्राहकांचा कल गणपतीच्या सजावटीसाठी पर्यावरण पूरक मखर आणि आरास वापरण्याकडे आता भाविकांचा कल वाढला Ganesh Chaturthi 2022 आहे . पुठ्ठ्यांच्या मखरांपाठोपाठ आता भावी कापडी मखर आणि आरास खरेदी करू लागले आहेत Ganapati decoration Shopping . लालबागमधील अनेक दुकानांमध्ये कापडी मखर cloth makhar खरेदीसाठी भाविक गर्दी करताना दिसतात.

काय आहेत कापडी मखर कापडी मखरांमध्ये तयार मंदिर महाल तसेच विविध कलाकुसर आणि कशिदा केलेले तयार मखर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच रंगीबेरंगी कपडे, झालर, घंट्या, फेटे, पडदे, जाळ्या अशा विविध स्वरूपात हे आरास करण्याचे साहित्य ग्राहकांना घेता येते.

किंमत आणि आकार तयार कपड्यांच्या मखरांमध्ये विविध प्रकारच्या आणि आकाराच्या पडद्यांचा समावेश आहे तसेच तयार मंदिर आणि इतर आरास यांचाही समावेश आहे. याचा आकार पाच बाय सहा फूट ते नऊ बाय दहा फुटापर्यंत उपलब्ध आहे. ग्राहक त्यांना हव्या असलेल्या आकारामध्ये आणि डिझाईन मध्ये आमच्याकडे कापडी मखर तयार करण्याची मागणी नोंदवतात त्याप्रमाणे आम्ही त्यांना कापडी मखर शिवून देतो या मकरांची किंमत तीनशे रुपयांपासून ते अडीच हजार रुपयांपर्यंत आहे. बाजारातील अन्य मखरांच्या तुलनेत हे मखर अतिशय स्वस्त पर्यावरण पूरक आणि पुन्हा पुन्हा वापरण्यायोग्य असल्याचे प्रतिक्रिया विक्रेते भूपेश चौधरी यांनी व्यक्त केली.

सुंदर आणि वाहून नेण्यासाठी सुलभ कापडी मखर दिसायला अतिशय सुंदर आणि मनमोहक आहेत. या मखरांच्या पडद्यावरील कलाकुसर डिझाईन आणि रंगसंगती हे पाहणाऱ्याला आकर्षित करून घेते. या मखरांची किंमत तुलनेने खूपच स्वस्त आहे आणि ते आपण पुन्हा धुवून वापरू शकतो. त्यामुळे आम्ही आता कापडी मखरच खरेदी करतो असे वैशाली पाटील सांगतात.

हेही वाचा Dahi Handi 2022 गणेशोत्सव आणि दहीहंडीच्या काळातील गुन्हे मागे घेणार, सरकारची घोषणा

Last Updated : Aug 24, 2022, 5:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.