ETV Bharat / city

Deepak Kesarkar देवेंद्र फडणवीसांमुळेच शिवसेना 2017 मध्ये मुंबईत सत्तेत, दीपक केसरकरांचा दावा

मुंबई महापालिकेत 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत came to power in Mumbai in 2017 देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्यामुळेच शिवसेना Shiv Sena सत्तेत असल्याचा गौप्यस्फोट because of Devendra Fadnavis शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर Deepak Kesarkar यांनी केला. आगामी महापालिका निवडणूक Mumbai Municipal Elections शिवसेना आणि भाजप युतीत लढवणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. मुंबईत पत्रकार परिषदे दरण्यान ते बोलत होते.

Deepak Kesarkar
दीपक केसरकर
author img

By

Published : Aug 20, 2022, 4:29 PM IST

मुंबई मुंबई महापालिकेत 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत came to power in Mumbai in 2017 देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्यामुळेच शिवसेना Shiv Sena सत्तेत असल्याचा गौप्यस्फोट because of Devendra Fadnavis शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर Deepak Kesarkar यांनी केला. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. आगामी महापालिका निवडणूक Mumbai Municipal Elections शिवसेना आणि भाजप युतीत लढवणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. मुंबईत पत्रकार परिषदे दरम्यान बोलत होते.

राज्यात आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रा सुरू आहे. ही शिवसंवाद यात्रा नाही, तर विसंवाद यात्रा आहे अशी टीकाही केसरकर यांनी केली. ज्या शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करत आहात, त्यांच्या वारसाकडून करार पत्र लिहून घेण्याचे पाप केले. शिवाजी महाराजांचे नाव घेऊन जे राजकारण करत आहात, त्याचा तुम्ही विचार करा. तुम्ही लोकप्रतिनिधींचा अनादर करत आहात, अशा कानपिचक्या मुंबईत पत्रकार परिषदे दरम्यान केसरकर यांनी, आदित्य ठाकरे यांना दिल्या.

माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत केसरकर म्हणाले की, हिंदुत्वासाठी आम्ही आपली पदे दावणीला लावली. हे कोणी करत नाही, पण आम्ही केले. बाळासाहेबांची इच्छा नसलेल्या लोकांसोबत यांनी सत्ता बनवली. जनतेने ज्यांना नाकारले होते, त्यांच्यासोबत हात मिळवणी करून सत्तेत बसले. स्वतः मुख्यमंत्री झाले. कदाचित त्यांची ती मजबुरी असेल. इतकेच नव्हे तर महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही मुलगा आणि वडील मंत्री झाले नाहीत, परंतु यांनी हे घडवले.

तसेच आदित्य ठाकरे हे चुकीच्या गोष्टी पसरवत आहेत. गोबेल्स नीती ते वापरत आहेत. महाराष्ट्रात गोबल्स नीती तयार होऊ देणार नाही. त्यामुळे यापुढे जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा केसरकर यांनी शिवसेनेला दिला आहे. १५० जागा निवडून आणणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बंद दाराआड झालेल्या चर्चेचा जे दाखला देत आहेत, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या शब्द आणि केलेली चर्चा जनतेला सांगा, असे खुले आव्हान केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना दिले.

२०१७ मध्ये मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आली असती. मात्र देवेंद्र फडणवीस यांचा मान ठेऊन उद्धव ठाकरे यांनी काहीही केले नाही. तेच आज आमच्याबद्दल सर्वत्र काहीही बोलत आहे. पण आता आमचा प्रत्येक प्रवक्ता यांना उत्तर देईल, असा इशारा देत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत दीडशे हून अधिक जागा निवडून आणू, असा दावा केसरकर यांनी केला. तसेच आमची युती कायम राहणार आहे, असेही केसरकर पत्रपरिषदे दरम्यान म्हणाले.

हेही वाचा Threat message to attack Mumbai मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची पाकिस्तानातून आली धमकी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.