ETV Bharat / city

Maharashtra Corona Update : कोरोना रुग्णसंख्येत घट कायम.. आज 5 हजार बाधितांची नोंद; 63 जणांचा मृत्यू

author img

By

Published : Feb 11, 2022, 8:41 PM IST

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस घट होताना दिसत ( Corona Patients Decreased In Maharashtra ) आहे. आज ११ फेब्रुवारी रोजी राज्यात ५ हजार कोरोना बाधितांची नोंद करण्यात ( New Covid Patients In Maharashtra ) आली. तर ६३ रुग्णांचा मृत्यू झाला ( Covid Deaths In Maharashtra ) आहे.

महाराष्ट्र कोरोना अपडेट
महाराष्ट्र कोरोना अपडेट

मुंबई - राज्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट सातत्याने होताना दिसत ( Corona Patients Decreased In Maharashtra ) असून, 5 हजार 455 नव्या बाधितांची नोंद झाली ( New Covid Patients In Maharashtra ) आहे. तर बरे होणारे रुग्ण 14 हजार 635 आहेत. राज्यात मृत्यूचा आकडा मात्र 63 इतका ( Covid Deaths In Maharashtra ) आहे. सक्रिय रुग्ण 60 हजार इतके असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. ओमायक्रॉनचे 76 रुग्ण सापडले असून, सर्वाधिक 46 रुग्ण पुणे मनपा हद्दीतील असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरुन दिसून येते.

तिसरी लाट ओसरण्यास सुरुवात

कोरोनाची तिसरी लाट ओसरू लागली ( Covid Third Wave Maharashtra ) असून, 5 हजार 455 रुग्ण सापडले आहेत. तर 14 हजार 635 रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. आतापर्यंत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 76 लाख 26 हजार 868 इतकी आहे. हे प्रमाण 97.34 टक्के इतके आहे. 63 जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत मृत्यूदर 1.82 टक्के इतके आहे. 7 कोटी 61 लाख 69 हजार 626 कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 10.29 टक्के इतके म्हणजेच 78 लाख 35 हजार 88 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 10 हजार 718 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 2392 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 60 हजार 902 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

ओमायक्रॉनचे 76 रुग्ण

राज्यात ओमायक्रॉनचा मागील आठवड्यापासून एकही नवा रुग्ण आढळून आलेला नव्हता. मात्र गुरुवारपासून पुन्हा रुग्ण आढळून येत आहेत. आज 76 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक पुणे मनपा 46, अमरावती 12, जालना 8, पुणे ग्रामीण 4, वर्धा 3, सिंधुदुर्ग, अहमदनगर आणि इतर राज्यात प्रत्येकी 1 रुग्ण सापडले आहेत. आजपर्यंत 3 हजार 531 एवढे रुग्ण बाधित झाले आहेत. तर 2353 जणांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याने सर्वांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत 8568 जणांची जनुकीय चाचणी केली. 7262 चाचण्याचे अहवाल प्राप्त झाले असून 1306 नमुने प्रलंबित आहेत, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण

  • मुंबई महापालिका - 367
  • ठाणे - 21
  • ठाणे मनपा - 57
  • नवी मुंबई पालिका - 51
  • कल्याण डोबिवली पालिका - 32
  • मीरा भाईंदर - 11
  • वसई विरार पालिका - 15
  • नाशिक - 195
  • नाशिक पालिका - 131
  • अहमदनगर - 432
  • अहमदनगर पालिका - 91
  • पुणे - 307
  • पुणे पालिका - 718
  • पिंपरी चिंचवड पालिका - 306
  • सातारा - 90
  • नागपूर मनपा - 231

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.