मुंबई : बिटकॉइन ( BTC ) आणि इतर क्रिप्टो शेअर्सच्या दरांमध्ये ऐतिहासिक अशी घसरण झाल्यानंतर बिटकॉइन आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. दोन आठवड्यापूर्वी बिटकॉइनची किंमत जवळपास ६ लाखांनी घसरली होती. बिटकॉइन या महिन्यातही पुन्हा एकदा घसरणीच्या मार्गावर ( Todays Bitcoin Rate ) आहे. गुंतवणूकदारांचा प्रतिसाद कमी असल्याने दर सातत्याने उतरत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत १७ लाख १९ हजार ६३६ रुपये इतकी आहे.
आजचा बिटकॉइनचा दर
आज बिटकॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात २१ हजार ७०६ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात १७ लाख १९ हजार ६३६ रुपये इतका आहे.
आजचा इथेरिअम कॉईनचा दर
आज इथेरिअम कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात १ हजार १८७ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात ९८ हजार ५७५ रुपये इतका आहे.
आजचा डोज कॉईनचा दर
आज डोज कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात ०.०७१ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात ५.६२ रुपये इतका आहे.
हेही वाचा : Gold Silver Rates : सोन्याचे भाव गडगडले.. 'इतक्या' रुपयांनी झालं स्वस्त.. पहा आजचे सोने- चांदीचे दर