मुंबई - शेअर बाजारमध्ये विविध कंपन्यांच्या शेअर्स प्रमाणे आता क्रिप्टोकरन्सीमध्ये देखील लोक गुंतवणूक करत आहे. क्रिप्टोकरन्सीला लोक पसंती देत असून शेअर्स प्रमाणे त्याचेही महत्व वाढले आहे. त्यामुळे, आज आम्ही तुम्हाला क्रिप्टोकरन्सीच्या ( Bitcoin price news ) दराबाबत माहिती देणार आहोत. जून महिन्यात काही क्रिप्टोकरन्सी ( Cryptocurrency Prices 20 June 2022 ) नफा आणि तोटा घेऊन आल्यात. दरम्यान आजचे दर बघितले तर बिटकॉईनच्या दरात वाढ दिसून आली आहे, तर टेथरच्या दरात किंचित घट दिसून आली आहे. जाणून घ्या क्रिप्टोकरन्सीचे आजचे दर.
1) बिटकॉईन - 16 लाख 39 हजार 365 रुपये
5.40 टक्के वाढ (83 हजार 964)
2) इथेरियम - 89 हजार 381
10.13 टक्के वाढ (8 हजार 222.19)
3) टेथर - 82.72
0.57 टक्के घट (0.47)
27 मे ते 31 मे पर्यंत बिटकॉईनच्या किंमतीत वाढ दिसून आली. मात्र, 31 मे नंतर बिटकॉईनचे दर घसरत होते. हे दर 18 जून नंतर वाढू लागले आहेत. पुढे काय होते. दर वाढतात की घटतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यातूनच नफा तोटा किती? आणि पुढची गुंतवणीकीची दिशा कळून येणार आहे.