ETV Bharat / city

#LOCKDOWN : राज्यात दारू विक्रीला परवानगी; काही ठिकाणी गर्दी तर काही भागात बंदी !

महाराष्ट्र सरकारने आजपासून (सोमवार) राज्यात ज्या व्यवसायांना परवानगी आहे, त्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार राज्यात सर्वत्र असलेले कंटेनमेंट भाग वगळता इतरत्र दारू विकता येणार आहे. अगदी रेड झोनमध्येही दारू विक्रीस परवाणगी देण्यात आली आहे.

author img

By

Published : May 4, 2020, 10:45 AM IST

Updated : May 4, 2020, 11:24 AM IST

दारू दुकान
दारू दुकान

मुंबई - केंद्र सरकारने १७ मे पर्यंत लॉकडाऊनचा विस्तार केल्यानंतर मुंबईसह राज्यातील १४ जिल्हे रेड झोनमध्ये आणि १६ जिल्हे ऑरेंज झोनमध्ये असल्याचे जाहीर केले. या घोषणेमुळे राज्यात दारू विक्रीला इतक्यात परवानगी मिळणार नाही, असे चित्र होते. पण महसूल मिळवण्यासाठी राज्यात दारू विक्री सुरू करावी अशी भूमिका सरकारने घेतली. त्यानुसार आज राज्यात रेड झोनसह सशर्त दारू विक्रीला सुरुवात होणार आहे. मात्र, राज्यात काही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून दुकाने बंद ठेवण्यास सांगितले आहे. त्यामुळे राज्यातील काही भागात दुकानांपुढे गर्दी तर काही भागात दुकानांना टाळे असल्याचे दिसत आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत दुकाने सुरु असणार आहेत.

हेही वाचा... राज्यातील कंटेनमेंट झोन वगळून इतर भागातील एकल दुकाने सुरू होणार

नाशिक, पुणे, मुंबई या भागात दारू विक्रीला परवानगी आहे. रेड झोन असूनही त्यातील कंटेनमेंट झोन वगळता दारू विक्री करता येणार आहे. या भागात सकाळपासूनच दारुच्या दुकानांबाहेर ग्राहकांनी हजेरी लावली होती.

पुण्यात दारू खरेदीसाठी मद्यपींच्या दुकानाबाहेर रांगा....

नागपूरात बंदी तरिही सकाळी दुकाने उघडली :

नागपूर शहर हे ‘रेड झोन’मध्ये असल्याकारणाने येथे कुठलीही शिथिलता राहणार नसल्याचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले होते. असे असतानाही येथील काही भागात सकाळी दारूच्या दुकांनांचे सिल उघडण्यात आले असल्याचे दिसून आले.

परभणी :

परभणी जिल्ह्यात 10 मे पर्यंत लॉकडाऊनचे सर्व नियम कायम राहणार आहेत. यामुळेच जिलह्यातील दारूची दुकाने देखील बंद राहतील. तेव्हा येथील मद्यपींना दारूसाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

नांदेड :

नांदेड जिल्ह्यात देखील परभणी प्रमाणे लॉकडाऊनचे आणि पूर्वीचेच सर्व नियम कायम राहणार आहे. येथे कोणतीही शिथिलता देण्यात आलेली नाही.

सोलापूर :

सोलापूरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यामुळे येथे केंद्राच्या नियमाप्रमाणे 17 तारखेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे.

भंडारा :

भंडारा जिल्हाधिकारी यांनी सध्या कोणतेही नवीन आदेश काढले नसल्याने सोमवारी सकाळपर्यंत सर्वच दारूची दुकाने सील लावलेली पहायला मिळाली आहेत.

अकोला :

अकोला जिल्ह्यात वैद्यकीय सेवा व्यतिरिक्त कोणतीही दुकाने दोन दिवस चालू न ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. तसेच दोन दिवस संचारबंदी आहे. त्यामुळे या ठिकाणी देखील दारू विक्री होण्याची चिन्हे दिसत नाही.

कोल्हापूर :

जिल्ह्यात सर्वत्र दारूची दुकाने सशर्त सुरू करण्याची परवानगी दिली आहे

अमरावती :

अमरावतीत औषधांची दुकाने वगळता सर्व काही बंद राहणार आहे. शहरातील 5 प्रतिबंधीत क्षेत्रात औषध दुकान उघडायलाही परवानगी नाही. 17 मे पर्यंत सर्वच दुकाने बंद राहणार आहेत.

औरंगाबाद :

कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता औरंगाबादमध्ये कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही,

जळगाव :

जळगाव जिल्हा रेड झोनमध्ये असल्याने जिल्ह्यातील सलून, मद्यविक्रीची दुकाने बंदच राहणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारने रेडझोनमधील मद्यविक्रीची दुकाने खुली करण्यास परवानगी दिली असली तरी जळगावात मात्र कोरोना बाधितांची रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला परवानगी नाकारली आहे. 17 मेपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत.

हिंगोली :

जिल्ह्यात दारूची दुकाने अद्याप बंद आहेत. याचे कारण दारूची दुकाने सुरू करणेबाबत अद्याप कोणतेही आदेश काढण्यात आलेले नाही.

रत्नागिरी :

रत्नागिरी नगरपालिका हद्दीतील अतिआवश्यक सेवा देणाऱ्या आस्थापना वगळून मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स आणि बाजारपेठा बंद राहतील. तर ग्रामीण भागातील सर्व प्रकारची दुकाने ( मॉल वगळून ) उघडी राहतील. मद्य विक्री दुकाने पूर्वपरवानगीने सुरु ठेवता येतील. मात्र मद्य विक्री करताना एका वेळी 5 पेक्षा जास्त व्यक्ती दुकानाजवळ उपस्थित राहणार नाहीत व प्रत्येक व्यक्तींमध्ये किमान 6 फुटांचे अंतर राहील, याची दक्षता घेणे आवश्यक राहील, असे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले आहेत. मात्र, अद्याप जिल्ह्यात दारू दुकाने, बाजारपेठा बंद आहेत.

हेही वाचा... "लॉकडाऊनमध्ये नागपुरात कुठलीही शिथिलता नाही, दारू दुकाने उघडणार नाहीत"

Last Updated : May 4, 2020, 11:24 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.