ETV Bharat / city

Covid Center Alert : मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिका रुग्णालये, कोविड सेंटर अलर्टवर - कोरोना रुग्ण

मुंबई - मुंबईत ( Mumbai ) मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत ( Active Corona Patients ) पुन्हा वाढ होऊ लागली आहे. गेले तीन दिवस २ हजारावर रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णालयातील बेडवर दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या हळूहळू वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये महापालिकेने पालिका रुग्णालयांसह वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स ( BKC ), मालाड आणि एनएससीआय (वरळी) या तीन जम्बो केंद्रांना अलर्टवर ठेवले आहे. तर मुलुंड, दहिसर, कांजूरमार्ग आणि गोरेगाव येथील जंबो कोविड सेंटर बंद ( Covid Center ) करण्यात आली आहेत अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Corona
Corona
author img

By

Published : Jun 18, 2022, 3:38 PM IST

मुंबई - मुंबईत ( Mumbai ) मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत ( Active Corona Patients ) पुन्हा वाढ होऊ लागली आहे. गेले तीन दिवस २ हजारावर रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णालयातील बेडवर दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या हळूहळू वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये महापालिकेने पालिका रुग्णालयांसह वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स ( BKC ), मालाड आणि एनएससीआय (वरळी) या तीन जम्बो केंद्रांना अलर्टवर ठेवले आहे. तर मुलुंड, दहिसर, कांजूरमार्ग आणि गोरेगाव येथील जंबो कोविड सेंटर बंद ( Covid Center ) करण्यात आली आहेत अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

कोरोनाचा प्रसार - मुंबईमध्ये मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून गेल्या सव्वा दोन वर्षात कोरोनाच्या तीन लाटा येऊन गेल्या. या तीनही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. जानेवारी फेब्रुवारी दरम्यान तिसऱ्या लाटेतील रुग्णांची संख्या आटोक्यात यायला सुरुवात झाली. एप्रिलमध्ये २० ते ३० रुग्ण दिवसाला आढळून येत होते. मे महिन्यात पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. जून महिन्यात सलग तीन दिवस २ हजाराच्या वर रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे आतापर्यंत एकूण १० लाख ९० हजार ५०३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ५७ हजार ६१९ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १३ हजार ३०४ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ३९९ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.१७० टक्के इतका आहे.

जंबो सेंटर अलर्टवर - मुंबईत रोज १३ ते १७ हजार चाचण्या केल्या जात आहेत. त्यात सुमारे ११ ते १५ टक्के पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णसंख्या वाढत असल्याने पालिका आयुक्तांनी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी), मालाड आणि एनएससीयुआय (वरळी) या तीन जम्बो केंद्रांना अलर्टवर ठेवले आहे. सर्व जम्बो कोविड केंद्रांना पुरेसे कर्मचारी ठेवण्याचे निर्देशही दिले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मालाड येथील जम्बो सेंटरला प्राधान्य दिले जात आहे. कोणत्याही प्रकारची कमतरता भासू नये म्हणून सर्व वैद्यकीय उपकरणांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुरेसे कर्मचारी ठेवण्याचे निर्देशही दिले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

कांजूरमार्ग जंबो सेंटर बंद - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत दिवसाला २१ हजार रुग्ण दिवसाला आढळून येत होते. जानेवारीनंतर रुग्णसंख्या कमी झाली. त्यामुळे मुलुंड, दहिसर, कांजूरमार्ग आणि गोरेगाव येथील जंबो कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या चार केंद्रांतील खाटांची क्षमता ८२०० इतकी आहे. सर्वाधिक म्हणजे २२०० खाटा गोरेगाव येथील नेस्को सेंटर मध्ये होती. दोन महिन्यांपूर्वी हे केंद्र पाडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. आता कांजूरमार्ग येथील केंद्र बंद केले जात आहे. यामधील औषधे, नियमित आणि विशेष अतिदक्षता विभाग, व्हेंटिलेटर, बायपॅप मशीन, मॉनिटर्स, एलएमओ तसेच इतर उपकरणे पालिकेच्या रुग्णालयात वापरली जाणार आहेत. तसेच ४० मेट्रिक टन ऑक्सिजन प्लांट मुलुंड जकात नाका येथे हलवण्यात येणार आहे. हा प्लांट भविष्यात ऑक्सिजन सिलिंडर रिफिलिंगसाठी वापरण्याचा प्रशासनाचा विचार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

१५.३९ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह - मुंबईत कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी पालिका आयुक्तांनी चाचण्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुंबईत गेल्या २४ तासात १४ हजार ६४३ चाचण्या करण्यात आल्या. त्यात २२५५ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. चाचण्यांच्या प्रमाणात १५.३९ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आज २ मृत्यूची नोंद झाली आहे. १९५४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ९० हजार ५०३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ५७ हजार ६१९ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १३ हजार ३०४ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ३९९ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.१७० टक्के इतका आहे. सध्या २४ हजार ८१८ बेड्स असून त्यापैकी ५६९ बेडवर रुग्ण आहेत. त्यापैकी ७६ रुग्ण ऑक्सिजनवर, ११५ रुग्ण आयसीयूमध्ये तर १४ रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण १०६ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

रुग्ण वाढले तरी भिऊ नका - मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तरीही भिण्याचे कारण नाही. जे रुग्ण आढळून येत आहेत त्यापैकी ९५ ते ९६ टक्के रुग्ण लक्षणे नसलेले आहेत. बहुतेक रुग्ण घरीच बरे होत असल्याने रुग्णालयात रुग्ण दाखल करण्याचे प्रमाण कमी आहे. तरीही पालिका रुग्णालये आणि जंबो कोविड सेंटर सज्ज आहेत. कोरोना विषाणूची लागण होऊ नये म्हणून नागरिकांनी मास्क घालावे, सुरक्षित अंतर राखावे, गर्दीच्या ठिकाणी काळजी घ्यावी, हात स्वच्छ धुवावेत या कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.

हेही वाचा -Police Murdered : जम्मू-कश्मीरमध्ये पोलीस उपनिरीक्षकाची दहशतवाद्यांनी केली हत्या, भातशेतीत मृतदेह सापडला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.