मुंबई - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून राज्य सरकारने निर्बंध लावले आहेत. त्यामुळे साईनगर-दादर आणि शिर्डी-पंढरपूर या दोन गाड्या रेल्वेप्रशासनाने पुन्हा रद्द केल्या आहेत. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्यानिमित्त गावी जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठीमध्य रेल्वे प्रशासनाकडून दर वर्षी शेकडो विशेष गाड्या चालवण्यात येतात. मात्र, यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाकडून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहेत. त्याचा फटका रेल्वे प्रशासनाला बसला असून मध्य रेल्वेने राज्या अंतर्गत आणखी १४ मेल एक्सप्रेस गाड्या रद्द केल्या आहेत.
या गाड्या केल्या रद्द-
१) ट्रेन क्रमांक 02147 दादर- साईनगर शिर्डी साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस ७ एप्रिल २०२१पर्यंत आणि ट्रेन क्रमांक 02148 साईनगर शिर्डी-दादर साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस ८ में २०२१पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.
२) ट्रेन क्रमांक 01131 दादर-साईनगर शिर्डी त्रि-साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस १० मे २०२१ पर्यंत आणि ट्रेन क्रमांक - 01132 साईनगर शिर्डी- दादर त्रि-साप्ताहिक विशेष एक्सप्रेस ११ मे २०२१ पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.
३) ट्रेन क्रमांक 01404 कोल्हापूर- नागपूर द्वि-साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस १० मे २०२१ पर्यंत आणि ट्रेन क्रमांक 01403 नागपूर- कोल्हापूर द्वि-साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस ११ मे २०२१ पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.
४) ट्रेन क्रमांक 01139 मुंबई- गदग विशेष एक्स्प्रेस १० मे २०२१ पर्यंत आणि 01140 गदग - मुंबई विशेष एक्स्प्रेस ११ मे २०२१ पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.
५) ट्रेन क्रमांक 02041 पुणे - नागपूर साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस १३ मे २०२१ पर्यंत आणि ट्रेन क्रमांक 02042 नागपूर - पुणे साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस १४ मे २०२१ पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.
६) ट्रेन क्रमांक 02239 पुणे - अजनी साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस १५ मे २०२१ पर्यंत आणि ट्रेन क्रमांक 02240 अजनी - पुणे साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस १६ मे २०२१ पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.
७) ट्रेन क्रमांक 02117 पुणे - अमरावती साप्ताहिकएक्स्प्रेस १२ मे २०२१ पर्यंत आणि ट्रेन क्रमांक 02118 अमरावती - पुणे साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस १३ मे २०२१ पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.
८) ट्रेन क्रमांक 02036 नागपूर - पुणे त्रि-साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस १५ मे २०२१ पर्यंत आणि ट्रेन क्रमांक 02035 पुणे - नागपूर त्रि-साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस १३मे २०२१ पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.
९) ट्रेन क्रमांक 01137 नागपूर - अहमदाबाद साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस १२ मे २०२१ पर्यंत आणि ट्रेन क्रमांक01138 अहमदाबाद - नागपूर साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस १३मे २०२१ पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.
१०) ट्रेन क्रमांक02223 पुणे - अजनी साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस १४ मे २०२१ पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.
११) ट्रेन क्रमांक01041 दादर - साईनगर शिर्डी आठवड्यातील चार दिवस ८ मे २०२१ पर्यंत आणि ट्रेन क्रमांक01042 साईनगर शिर्डी - दादर आठवड्यातील चार दिवस विशेष ९ मे २०२१ पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.
१२) ट्रेन क्रमांक 01027 दादर - पंढरपूर त्रि-साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस १० मे २०२१ पर्यंत आणि ट्रेन क्रमांक 01028 पंढरपूर-दादर त्रि-साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस ११ मे २०२१ पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.
१३) ट्रेन क्रमांक 02235 लोकमान्य टिळक टर्मिनस - सिकंदराबाद विशेष एक्स्प्रेस २८ मे २०२१ पर्यंत आणि ट्रेन क्रमांक 02236 सिकंदराबाद - लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष एक्स्प्रेस २९ मे २०२१ पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.
१४) ट्रेन क्रमांक 09125 सूरत - अमरावती द्वि-साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस १४ मे २०२१ पर्यंत आणि ट्रेन क्रमांक09126 अमरावती - सूरत द्वि-साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस १५ मे २०२१ पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.