मुंबई - देशातील अर्थव्यवस्था ही चुकीच्या धोरणामुळे कोलमडली आहे. असे असताना केंद्र सरकार या अर्थव्यवस्थेचा कॅन्सरवर बाम लावून इलाज करत आहे. परंतु असा इलाज होत नाही, अशी टीका अखिल भारतीय काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी आज (शुक्रवार) मुंबईत पत्रकार परिषदेत केली.
देश हा आर्थिकदृष्टया रसातळाला पोहोचला असून भाजप हेडलाईन मॅनेजमेंट करण्यात मश्गूल आहे. हे लोक मंदीवर बोलताना जागतिक मंदीकडे बोट दाखवतात. परंतु २००८ मध्ये आलेल्या जागतिक मंदीत भारत खंबीरपणे उभा होता. कारण त्यावेळी देशाची कमान ही एका अर्थतज्ज्ञाच्या हातात हेाती, असा दाखलाही वल्लभ यांनी यावेळी दिला.
हेही वाचा - पवारांची पॉवर : राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले पुन्हा विधानसभेत दिसणार नाहीत
मोदी सरकारने अर्थव्यवस्थेचा जीव घेतला
मोदी सरकारने केलेली मागील काही वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेवर गोळी मारून मारून जीव घेतला. नोटाबंदी करून पहिली गोळी आणि दुसरी जीएसटी करून देशाची अर्थव्यवस्था मारून टाकली, असा आरोपही वल्लभ यांनी केला. यामुळे देशाला भविष्यात याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. यामुळे देशाची अर्थव्यवस्था कशी सुधारणार आहात, त्यासाठी श्वेत पत्रिका काढून देशाला माहिती द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
हेही वाचा - आज बाळासाहेब ठाकरे असते तर? 'अशी' असती शिवसेना!
मागील दोन महिन्यात साडेतीन लाख नोकऱ्या गेल्या असून दीड लाख जणांच्या जाण्याच्या मार्गावर आहे. कॉर्पोरेटमध्ये प्रत्येक दिवशी लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला जात आहे. १ लाख ७६ हजार कोटी आरबीआयमधून काढले गेले. हा पैसे कुठे खर्च केले जात आहेत, याची माहितीही दिली जात नाही. तर दुसरीकडे महाराष्ट्रात जानेवारीपासून आत्तापर्यंत ६०१ शेतकऱ्यांची आत्महत्या केली, सरकारने अनेक गांवामध्ये पाण्याची व्यवस्था केली नाही, असा आरोपही गौरव वल्लभ यांनी केला.