मुंबई- राहुल गांधी यांचा वाढदिवस काँग्रेसकडून आज 'संकल्प दिन' म्हणून साजरा केला जात आहे. देशात महागाई वाढली आहे. याचा फटका सर्वसामान्य व्यक्तींना बसत असून, शनिवारी राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त वाढत्या महागाईच्या विरोधात काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले.
वाढत्या महागाईमुळे केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसने मुंबईमध्ये आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी महागाईचा निषेध केला आहे.या आंदोलनाला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, आमदार झिशान दिद्दीकी, माजी आमदार बाबा सिद्दिकी आणी नसिम खान हे उपस्थित होते. एलफिस्टन परिसरात हे आंदोलन करण्यात आले.
काँग्रेसकडून केंद्र सरकारचा निषेध
राहुल गांधी यांचा वाढदिवस काँग्रेसकडून संकल्प दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. वाढदिवसानिमित्त मुंबईत काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी इंधन दरवाढ, नवीन कृषी कायदे तसेच सरकारच्या धोरणांचा या आंदोलनातून निषेध करण्यात आला. इंधन दरवाढ कमी करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील यावेळी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.
हेही वाचा - सिंधुदुर्गात शिवसेना-भाजपा आमने सामने, कुडाळमध्ये पोलीस छावणीचे स्वरूप