ETV Bharat / city

निवडणुकीच्या तोंडावरच भाजपाला भगवतगीता कशी आठवली, काँग्रेस नेत्याचा सवाल - मुंबई महापालिका शाळा भगवत गीता

महापालिका शाळांमध्ये भगवतगीतेचे पठण केले जावे, अशी मागणी भाजपाच्या नगरसेविकेने ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे. यावर निवडणुकीच्यावेळी आपल्या पक्षाला फायदा करून घेण्यासाठी हा मुद्दा समोर आणला आहे. निवडणुकीच्या आधीच भगवतगीता, रामायण भाजपाला कसे सुचले, असा प्रश्न पालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते रवी राजा ( Congress Leader Ravi Raja comment on Bhagavad Gita ) यांनी उपस्थित केला आहे.

Ravi Raja comment on Bhagavad Gita
भगवत गीता मागणी रवी राजा प्रतिक्रिया
author img

By

Published : Feb 17, 2022, 8:29 PM IST

मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावर भाजपकडून हिंदुत्वाचे कार्ड खेळण्यात आले आहे. महापालिका शाळांमध्ये भगवतगीतेचे पठण केले जावे, अशी मागणी भाजपाच्या नगरसेविकेने ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे. यावर निवडणुकीच्यावेळी आपल्या पक्षाला फायदा करून घेण्यासाठी हा मुद्दा समोर आणला आहे. निवडणुकीच्या आधीच भगवतगीता, रामायण भाजपाला कसे सुचले, असा प्रश्न पालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते रवी राजा ( Congress Leader Ravi Raja comment on Bhagavad Gita ) यांनी उपस्थित केला आहे.

माहिती देताना महापालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा

हेही वाचा - Sanjay Raut on Kirit Somaiya File : किरीट सोमैय्यांवरील आरोपांबाबतची फाईल मुख्यमत्र्यांकडे - संजय राऊत

निवडणुकीच्या तोंडावरच भगवतगीता का?

भाजपच्या नगरसेविका योगिता कोळी यांनी मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये भगवतगीतेचे पठण केले जावे, अशी मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी महापौरांना पत्र देऊन पालिका सभागृहात ठरावाची सूचना मांडली आहे. त्यावर रवी राजा बोलत होते. यावेळी बोलताना, भाजपच्या नेत्यांना, नगरसेवकांना निवडणुकीच्या तोंडावरच भगवतगीता, रामायण कसे लक्षात आले. ते २०१७ पासून गेल्या पाच वर्षांत कधीही ठरावाची सूचना आणू शकले असते. भाजपवाल्यांनी भगवतगीताच का? रामायण, तुलसीदास सर्वांना घेऊन यावे. भाजपावाले लोकांच्या हिताची कामे करत नाहीत, त्यामुळे निवडणुकीच्यावेळी फायदा करून घेण्यासाठी हा मुद्दा समोर आणला आहे. भाजपा नगरसेविका योगिता कोळी यांचे पती गेल्या निवडणुकीच्या आधी काँग्रेसमध्ये होते. गेल्या पालिका निवडणुकीत त्यांनी भाजपात प्रवेश केला. यावरून त्यांनी कशा प्रकारे ही ठरावाची सूचना आणली असेल हे दिसून येते. त्याला जास्त महत्व देण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया रवी राजा यांनी दिली.

काय आहे भाजप नगरसेविकेची मागणी?

भगवतगीता हा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान विषयक ग्रंथ आहे. तसेच, हा ग्रंथ वेदांच्या अखेरच्या रचनेतील 'गीतोपनिषद' म्हणूनही प्रसिद्ध आहे. त्यात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाबद्दल केलेला उपदेश आहे. ५ हजार वर्षांपूर्वी २५ डिसेंबर या दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. भारतीय या ग्रंथाला पवित्र धर्मग्रंथ समजतात. त्यामुळे, न्यायालयात गीतेवर हात ठेवून शपथ घेण्याची प्रथा पडली आहे. भगवतगीता हा हिंदुस्थानातला अतिशय महत्त्वाचा व मानवी इतिहासातल्या ग्रंथांपैकी अतिशय तत्त्वज्ञानावर आधारलेला महत्त्वाचा संदर्भग्रंथ आहे. महाभारतातल्या महायुद्धाच्या वेळेस भगवान श्रीकृष्णांनी गीता अर्जुनास मार्गदर्शन स्वरुपात सांगितली, असे महाभारताच्या कथेत म्हटले आहे. हा ग्रंथ मानवाला परमोच्च ज्ञान देतो आणि जीवन कसे जगावे यांचे मार्गदर्शन करतो, असे मानले जाते. सामान्य जनांमध्ये भगवतगीता, 'गीता' या नावाने ओळखली जाते. हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा मार्गदर्शकपर ग्रंथ आणि मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान सुखकर करण्याकरता उपयुक्त ठरेल, असा संदर्भग्रंथ असे या गीतेचे स्वरूप आहे. जगातील विविध देशांतले व विविध धर्मांतले असंख्य तत्त्ववेत्ते, शास्त्रज्ञ आणि विचारवंत यांनी या ग्रंथाबद्दल कायमच गौरवोद्गार काढले आहेत आणि मानवी जीवनाच्या अथांग सागरामधे गीतेला दीपस्तंभाचे स्थान दिले आहे. गीतेतील ज्ञानामुळे माणसाला अत्युच्च समाधान आणि आनंद मिळतो व त्याचप्रमाणे मोक्षाचा मार्ग सापडण्यास मदत होते म्हणून गीतेला 'मोक्षशास्त्र' म्हणले गेले आहे. भावी पिढीवर योग्यप्रकारचे संस्कार होतील, अशी मागणी नगरसेविका योगिता कोळी यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे. सदर ठरावाची सूचना लवकरच मंजूर होईल, अशी अपेक्षा कोळी यांनी व्यक्त केली.

हेही वाचा - Thane Bay Area : ठाणे खाडी क्षेत्राला रामसर स्थळाचा दर्जा; राज्याचा केंद्र सरकारला प्रस्ताव

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.