ETV Bharat / city

वॉटसअॅपवर करता येणार मुंबईतील रस्त्यातील खड्ड्यांची तक्रार

मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडतात. खड्ड्यांमुळे नागरिक जखमी होतात, त्यांचा मृत्यूही होतो. यासाठी पालिकेने खड्डे त्वरित बुजवण्याचा निर्णय घेतला आहे. खड्डे आणि खराब पॅचबाबत नागरिकांना तक्रारी दाखल करण्यासाठी पालिकेने 24 वॉर्डातील अधिकाऱ्यांसह एमएमआरडीए अधिकाऱ्यांचे वॉटसअॅप मोबाईल नंबर प्रसिद्ध करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. नागरिकांना मोबाईल अॅपवरही खड्ड्यांचा फोटासह तक्रार करता येणार आहे. त्यामुळे खड्ड्यांची तक्रारींची तात्काळ दखल घेऊन तो खड्ड़ा भरला जाणार आहे.

खड्डे
खड्डे
author img

By

Published : Jun 16, 2022, 8:57 AM IST

मुंबई - मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडतात. खड्ड्यांमुळे नागरिक जखमी होतात, त्यांचा मृत्यूही होतो. यासाठी पालिकेने खड्डे त्वरित बुजवण्याचा निर्णय घेतला आहे. खड्डे आणि खराब पॅचबाबत नागरिकांना तक्रारी दाखल करण्यासाठी पालिकेने 24 वॉर्डातील अधिकाऱ्यांसह एमएमआरडीए अधिकाऱ्यांचे वॉटसअॅप मोबाईल नंबर प्रसिद्ध करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. नागरिकांना मोबाईल अॅपवरही खड्ड्यांचा फोटासह तक्रार करता येणार आहे. त्यामुळे खड्ड्यांची तक्रारींची तात्काळ दखल घेऊन तो खड्ड़ा भरला जाणार आहे.

खड्डे तात्काळ बुजवणे सोपे होणार - बृहन्‍मुंबई महापालिकेच्‍या अखत्‍यारितील रस्‍त्‍यांवर पावसाळ्यादरम्‍यान खड्डे पडतात. मात्र, यात मेट्रो व इतर प्राधिकरणांच्या कामांमुळेही रस्त्यांवर खड्डे आणि खराब पॅचबाबत तक्रारी नोंद होत असतात. यातील बहुतेक तक्रारी वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि मेट्रो रेल्वेचे काम सुरू असलेल्या भागाशी संबंधित आहेत. नागरिक पालिकेकडे तक्रारी करून त्यांची दखल घेण्याची मागणी करतात. अनेक वेळा, नागरिक व काही संस्था या खड्ड्यांसंबंधीच्या तक्रारी एमएमआरडीएकडेही करत असतात. पण, त्याचे निरसन होत नसल्याने या सर्वाला पालिकेला सामोरे जावे लागते. त्यामुळे खड्ड्यांच्या तक्रारी करण्यासाठी पालिकेच्या वॉर्डनिहाय अधिकाऱ्यांसह एमएमआरडीए अधिकाऱ्यांचे नंबर प्रसिद्ध केले जाणार आहे. या नंबरवर नागरिकांना तक्रार करता येणार आहे. त्यामुळे खड्डे तात्काळ बुजवणे पालिकेला सोपे होणार आहे.

बॅनर, फ्लेक्स बोर्डवर अधिकाऱ्यांचे नंबर - मुंबईतील 25.33 किलोमीटर लांबीचा पश्चिम द्रुतगती महामार्ग, 25.55 किलोमीटर लांबीचा पूर्व द्रुतगती महामार्ग आणि वांद्रे-कुर्ला संकुल परिसरातील रस्‍ते हे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्‍या अखत्‍यारित येतात. बृहन्‍मुंबई महापालिकेच्‍या अखत्‍यारितील रस्‍त्‍यांवर पावसाळ्यादरम्‍यान काही खड्डे किंवा खराब पट्ट्या उद्भवण्‍याची शक्‍यता असते. ही शक्‍यता लक्षात घेऊन महापालिकेच्‍या रस्‍ते व वाहतूक खात्‍याद्वारे वेळोवेळी आवश्‍यक ती कार्यवाही नियमितपणे केली जात आहे. यंदाही खड्डे बुजवण्यासाठी येणाऱ्या तक्रारींची तात्काळ दखल घेतली जाणार आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर नावासह प्रसिद्ध केले जाणार आहे. यंदा प्रथमच एमएमअरडीए अधिकाऱ्यांचेही मोबाईल नंबर प्रसिद्ध केले जाणार आहेत. विविध वॉर्डात मोठ्या फॉन्टमध्ये बॅनर किंवा फ्लेक्स बोर्ड प्रदर्शित केले जाणार आहेत. यावर अधिकार्‍यांचे संपर्क क्रमांक असणार आहेत. तसेच वृत्तपत्रांद्वारेही अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक प्रसिद्ध केले जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा - Corona Update Today : देशात १०९ दिवसानंतर पहिल्यांदाच कोरोना रुग्णसंख्या १० हजारांहून अधिक, महाराष्ट्रात ४०२४ नवे रुग्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.