मुंबई- मुंबईतील गेट वे ऑफ इंडियापासून ( Gate Way Of India ) समुद्रात तरुणी तिच्या मित्रासोबत आज रविवार रोजी बोटीवर फिरायला गेली होती. मात्र, बोटमध्ये फिरत असताना आलेल्या मोठ्या समुद्राच्या लाटेमुळे तरुणी बोटमधून खाली ( Women In Boat Fell Into Sea ) पडली. या समुद्रात बुडणाऱ्या एका मुलीची सुटका करण्यात आली आहे. कोस्टल पोलीस आणि कुलाबा पोलिसांनी तरुणीला सुखरुप बाहेर ( Costal Colaba Police Save lives ) काढले. मोठी लाट बोटीला धडकल्यामुळे तोल जाऊन तरुणी पाण्यात पडली होती.
-
#WATCH | A team of Coastal Police & Colaba Police rescued a woman tourist who was drowning in the sea near Gateway of India, Mumbai today. The woman lost control and fell into the water after a strong ocean current hit her boat: Mumbai Police pic.twitter.com/UQFOfMQ8oK
— ANI (@ANI) January 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | A team of Coastal Police & Colaba Police rescued a woman tourist who was drowning in the sea near Gateway of India, Mumbai today. The woman lost control and fell into the water after a strong ocean current hit her boat: Mumbai Police pic.twitter.com/UQFOfMQ8oK
— ANI (@ANI) January 9, 2022#WATCH | A team of Coastal Police & Colaba Police rescued a woman tourist who was drowning in the sea near Gateway of India, Mumbai today. The woman lost control and fell into the water after a strong ocean current hit her boat: Mumbai Police pic.twitter.com/UQFOfMQ8oK
— ANI (@ANI) January 9, 2022
अन् मोठा अनर्थ टळला..
मुंबईतील गेट वे ऑफ इंडियापासून काही अंतरावर समुद्रात पडलेली ही तरुणी आपल्या मित्रांसोबत फिरायला गेली होती. रविवार असल्याने गेट ऑफ इंडियावरून मोठ्या प्रमाणात मुंबईकर समुद्रात फिरण्यासाठी जात असतात. आपल्या मित्रांसोबत ती तरुणी फिरायला गेली होती. त्यावेळी ती समुद्रात पडली होती. या तरुणीला कोस्टल पोलीस आणि कुलाबा पोलिसांकडून सुखरुप बाहेर काढल्यानंतर तिला गेट ऑफ इंडिया इथे आणण्यात आले आहे. कोस्टल पोलीस आणि कुलाबा पोलिसांनी तरुणीला सुखरुप बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
अन् तिचा तोल ढासळला ..
संबंधित तरुणी तिच्या मित्रासोबत बोटीवर फिरायला गेली होती. मात्र, अचानक समुद्रात मोठी लाट आली आणि बोटीला धडकली. त्यामुळे बोटीसोबतचा तिचा तोल ढासळला. यानंतर बोटीच्या किनाऱ्यावर बसलेली मुलगी समुद्रात पडली. तात्काळ कोस्टल पोलीस आणि कुलाबा पोलिसांच्या गस्त करणाऱ्या पथकांना माहिती देण्यात आली.
हेही वाचा - Sulli Deal App : सुल्ली डील ॲपवर हिंदुद्वेषी मुलींची लागायची बोली ; ट्विटरवरुन घेतला जायचा शोध