ETV Bharat / city

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलल्या

author img

By

Published : Feb 25, 2021, 4:24 PM IST

आटोक्यात आलेल्या कोरोनाचा प्रसार आणि प्रादुर्भाव पुन्हा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका आता ३१ मार्च २०२१ पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय राज्याच्या सहकार विभागाने घेतला आहे.

co-operative elections were postponed till March 31
सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलल्या

मुंबई - आटोक्यात आलेल्या कोरोनाचा प्रसार आणि प्रादुर्भाव पुन्हा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका आता ३१ मार्च २०२१ पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय राज्याच्या सहकार विभागाने घेतला आहे. तसेच ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या नाहीत, त्यांच्या निवडणुका कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करून घ्याव्यात अशा, सूचना सहकार विभागाने केल्या आहेत.

कोरोना रुग्ण संख्येचा आलेख वाढतोय-

गेल्या काही दिवसांपासून नियंत्रणात आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या सध्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्य सरकार, महापालिका, स्थानिक प्रशासनाने कंबर कसली आहे. हात धुणे, मास्क लावणे, शारीरिक अंतर राखणे आणि गर्दी टाळण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. 'मी जबाबदार' मोहीम राज्यभर राबवली जात आहे. आज सुमारे ८ हजार नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले.

३१ डिसेंबर २०२१ पर्यंत निवडणूक पुढे-

कोरोना आटोक्यात येण्यास काही काळ लागणार आहे. अशा वेळी सहकार संस्थांच्या निवडणुका घेणे योग्य होणार नाही. या निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात घेण्याच्या दृष्टिकोनातून या निवडणुका ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे सहकार विभागाने घेतला होता. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेश ज्यांना दिले आहेत. अशा सहकारी संस्था तसेच २५० पेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था वगळून, राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका राज्य सरकारकडे असलेल्या अधिकारांचा वापर करून पुढे ढकलण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे.

कोविड नियमांचे पालन अनिवार्य-

ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुका या आदेशान्वये पुढे ढकलण्यात आलेल्या नाहीत. त्यांच्या निवडणुका घेण्याबाबत शासनाच्या कोरोनासंदर्भातील मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करुन निवडणुका घेण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश राज्य सहकार विभागाने स्थानिक प्रशासनाना दिले आहेत.

हेही वाचा- पंतप्रधान मोदी मला सरदार पटेलांपेक्षा मोठे वाटू लागलेत - संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.