ETV Bharat / city

'एस.पी. बालसुब्रमण्यम यांनी संगीत हे भाषा-प्रांतापलीकडे पोहचवले' - ज्येष्ठ गायक एस.पी. बालसुब्रमण्यम निधन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

cm
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
author img

By

Published : Sep 25, 2020, 3:14 PM IST

मुंबई - आपल्या नाद-मधूर सुरांनी संगीत हे भाषा-प्रांत यांच्या पलिकडे असते हे सिद्ध करणारे ज्येष्ठ गायक एस. पी. बालसुब्रमण्यम सुरांच्या दुनियेतील मनस्वी अवलिया होते. त्यांना काळाने आपल्यातून ओढून नेले आहे, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

हेही वाचा - 'एसपीं'च्या निधनाने संगीतातील एका सुवर्ण युगाचा अंत

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, भारतीय चित्रपटसृष्टीला मिळालेले संगीताचे वरदान 'एसपीं'नी आपल्या सुरांनी आणखी झळाळून टाकले. त्यांनी सोळा भाषांतून हजारो गाणी गायली, तिही विविध प्रकारची. यातून सुरांवर हुकूमत गाजवणाऱ्या 'एसपीं'नी आपला एक रसिक वर्ग निर्माण केला. संगीत हे भाषा आणि प्रांत या पलिकडे असते हे सिद्ध करत 'एसपीं'नी आपल्या नाद-मधूर सुरांनी भारतासह जगातील रसिकांना मोहवून टाकले. त्यांचा आवाज हीच त्यांची ओळख होती. अगदी अलिकडे त्यांनी मराठीतही एक गाणे आपल्या मनस्वी शैलीत गायले होते. कोरोनाशी झुंज देत असणाऱ्या या सुरांच्या दुनियेतील अवलियाला काळाने आपल्यातून ओढून नेले आहे. त्यांच्या आवाजाची जादू मागे राहील, ते त्या अर्थाने अजरामर आहेत. पण, एक मनस्वी कलाकार आपल्यातून निघून जाणे दुःखद असल्याची भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. तसेच ज्येष्ठ गायक एस.पी.सुब्रमण्यम यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.