ETV Bharat / city

मुख्यमंत्री कोकण दौरा LIVE Updates : पूर्ण आढावा घेतल्यानंतर मदतीसंदर्भात निर्णय - उद्धव ठाकरे

author img

By

Published : May 21, 2021, 9:23 AM IST

Updated : May 21, 2021, 2:53 PM IST

cm kokan tour live update
मुख्यमंत्री कोकण दौरा LIVE Updates

10:29 May 21

दौऱ्याच्या सुरुवातीला उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद..

09:44 May 21

मोदी महाराष्ट्राला मदत करतील..

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्याप्रमाणे गुजरातला मदत जाहीर केली, त्याचप्रमाणे ते महाराष्ट्रालाही मदत करतील अशा विश्वास ठाकरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

09:43 May 21

विरोधकांना उत्तर देण्यासाठी नाही आलो..

या दौऱ्यावर मी विरोधकांना उत्तर देण्यासाठी नाही, तर कोकणवासियांना दिलासा देण्यासाठी आलो आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले. मी इथे फोटोसेशन करायला नाही आलो; तसेच हेलिकॉप्टरमधून नाही, तर जमीनीवरुन पाहणी करणार आहे असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

09:39 May 21

मदतीसंदर्भात काय म्हणाले मुख्यमंत्री..

रत्नागिरीमधील प्राथमिक आढावा घेतला आहे. नुकसानग्रस्तांना कोणत्या निकषानुसार मदत जाहीर करायची याचा निर्णय पूर्ण आढावा झाल्यानंतर घेण्यात येईल. तसेच, पंचनामे पूर्ण होताच मदतीसंदर्भात निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी रत्नागिरीमध्ये दिली. या दौऱ्यादरम्यान आपण जास्त फिरण्यापेक्षा महत्त्वाच्या गोष्टींना वेळ देणार असल्याचेही ते म्हणाले.

09:17 May 21

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं रत्नागिरीत आगमन..

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं रत्नागिरीत आगमन..
  • विमानतळावरच सुरू आहे आढावा बैठक..
  • रत्नागिरीतून जाणार सिंधुदुर्गत..

09:14 May 21

तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्र्यांचा आज कोकण दौरा..

उदय सामंत यांनी दिली मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची माहिती..

रत्नागिरी - तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एका दिवसाचा कोकण दौरा करणार आहेत. आज(शुक्रवार) त्यांचा कोकण दौरा असून, या दौऱ्यादरम्यान रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी मुख्यमंत्री करणार आहेत. मुख्यमंत्री रत्नागिरीत दाखल झाले असून विमानतळावरच ते जिल्ह्यासंदर्भातील आढावा बैठक घेणार असल्याचे समजते आहे.

असा असणार मुख्यमंत्र्यांचा दौरा

  • सकाळी ८.३५ वाजता रत्नागिरी विमानतळ येथे आगमन.
  • ०८.४० वा. तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनासमवेत आढावा बैठक.
  • सकाळी ९.४० वाजता हेलिकॉप्टरने चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग येथे आगमन व मोटारीने वायरी ता. मालवणकडे रवाना.
  • सकाळी १०.१० वाजता वायरी, ता.मालवण येथे तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी.
  • सकाळी १०.२५ वाजता मोटारीने मालवण येथे आगमन व तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी.
  • सकाळी ११.०५ वाजता निवती, ता. वेंगुर्ला येथे तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी.
  • या पहाणीनंतर सकाळी ११.३० वाजता चिपी विमानतळ बैठक सभागृह येथे मोटारीने आगमन व नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनासमवेत आढावा बैठक.
  • चिपी विमानतळ येथून हेलिकॉप्टरने रत्नागिरीकडे रवाना.
  • दुपारी १२.३५ वाजता रत्नागिरी विमानतळ येथे आगमन व विमानाने मुंबईकडे रवाना.

Last Updated : May 21, 2021, 2:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.