ETV Bharat / city

मजूरांच्या प्रवासासाठी ५४ कोटी ५७ लाखाचा मुख्यमंत्री निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्रात परराज्यातून आलेले मजूर आणि महाराष्ट्राबाहेर अडकलेले राज्यातील मजूर यांच्या प्रवासासाठी ५४ कोटी ५७ लाखाचा निधी मुख्यमंत्री निधीतून देण्यात आलाय. हा निधी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आला आहे.

CM Funds
मुख्यमंत्री निधी
author img

By

Published : May 13, 2020, 5:38 PM IST

मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक भरडलेल्या परराज्यातील मजूरांसाठी केंद्र सरकारने धरसोडवृत्तीचे वाहतूक धोरण स्वीकारले. परराज्यातील स्थलांतरीत मजूरांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी तसेच इतर राज्यात महाराष्ट्रातील स्थलांतरीत कामगार, मजुर अडकले आहेत त्यांना पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी अशा मजूरांच्या श्रमिक रेल्वे तिकिटाचे शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून भरण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली होती. त्यानंतर या ३६ जिल्ह्यांना ५४ कोटी ७५ लाख ४७ हजार ७० रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तो निधी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे.

कोविड १९ च्या साथीमुळे लॉकडाऊन जाहीर झाले आणि महाराष्ट्रात इतर राज्यातील कामगार आणि मजूर अडकले. तसेच महाराष्ट्रातील कामगार आणि स्थलांतरीत मजुरही इतर राज्यांमध्ये अडकले आहेत. त्यांना या निर्णयाने मोठा दिलासा मिळेल. सचिव आपत्ती व्यवस्थापन व मदत व पुनर्वसन विभाग यांनी दिलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या यादीप्रमाणे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील रकमांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. या निधीचा वापर केवळ ज्या कारणासाठी वितरित करण्यात आला आहे त्यासाठीच करता येणार आहे हे ही स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्ह्याना देण्यात आलेला निधी असा:

*अक्र* *जिल्हा* *प्रदान केलेली रक्कम*

1 मुंबई शहर 12,96,00,000

2 मुंबई उपनगर 10,00,00,000

3 ठाणे 4,80,00,000

4 रायगड 2,50,00,000

5 रत्नागिरी 1,50,00,000

6 पालघर 3,00,00,000

7 सिंधुदूर्ग 1,00,00,000

8 नाशिक 40,00,000

9 धुळे 25,00,000

10 नंदुरबार 25,00,000

11 जळगांव 20,00,000

12 अहमदनगर 20,00,000

13 पुणे 8,00,00,000

14 सातारा 95,81,270

15 सांगली 30,00,000

16 सोलापूर 50,00,000

17 कोल्हापूर 1,25,91,400

18 औरंगाबाद 80,00,000

19 जालना 50,00,000

20 बीड 30,00,000

21 परभणी 50,00,000

22 हिंगोली 6,00,000

23 नांदेड 20,00,000

24 उस्मानाबाद 20,00,000

25 लातूर 60,00,000

26 अमरावती 30,00,000

27 अकोला 12,74,400

28 वाशिम 10,00,000

29 बुलढाणा 20,00,000

30 यवतमाळ 35,00,000

31 नागपूर 1,20,00,000

32 वर्धा 30,00,000

33 गोंदिया 25,00,000

34 भंडारा 24,00,000

35 चंद्रपूर 30,00,000

36 गडचिरोली 15,00,000

..........................................................

*एकूण रूपये* *54,75,47,070*

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.