ETV Bharat / city

दहावीच्या निकालाचा बट्ट्याबोळ; निकालासाठी विद्यार्थ्यांना करावी लागणार प्रतीक्षा

author img

By

Published : Jul 6, 2021, 8:52 PM IST

दहावीचा निकाल १५ जुलै २०२१ पर्यंत जाहीर करण्याचा दावा शालेय शिक्षण विभागाने केला होता. मात्र, आतापर्यंत निकालाचे ६० टक्के सुद्धा काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे, दहावीच्या निकालासाठी विद्यार्थ्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

मुंबई - कोरोनाची गंभीर परिस्थिती, मुलांमधील संभाव्य वाढत्या प्रादुर्भावाची भीती, तसेच तिसऱ्या लाटेची शक्यता इत्यादी बाबी विचारात घेऊन दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. दहावीचा निकाल १५ जुलै २०२१ पर्यंत जाहीर करण्याचा दावा शालेय शिक्षण विभागाने केला होता. मात्र, आतापर्यंत निकालाचे ६० टक्के सुद्धा काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे, दहावीच्या निकालासाठी विद्यार्थ्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

हेही वाचा - फोन टॅपिंग करायला लावणारा मुख्य सुत्रधार कोण? - नाना पटोलेंचा सवाल

६० टक्केही काम झालेले नाही

दहावीची परीक्षा रद्द केल्यानंतर निकाल जाहीर करण्याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. निकाल कशा पद्धतीने जाहीर करण्यात येणार, याबाबत विद्यार्थी व पालकांकडून विचारणा करण्यात येत होती. मात्र, आता राज्य मंडळाने दहावीचा निकाल करण्यासंदर्भातील कार्यपद्धती जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार, यासाठी ऑप्टिकल मार्क्स रीडिंग या पद्धतीनुसार नववी आणि दहावीच्या अंतर्गत परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या गुणांच्या आधारावर दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यासाठी नववीचे ५० टक्के गुण, दहावीच्या अंतर्गत मुल्यमापनाचे ३० टक्के गुण आणि दहावीतील प्रकल्प आदींचे २० टक्के गुण मिळवून निकाल तयार केले जाणार आहे. दहावीचा निकाल जाहीर करण्यासाठी महाराष्ट्र शिक्षण मंडळाने राज्यातील शिक्षकांना १४ जून २०२१ पासून शाळेत बोलवले होते. मात्र, कोरोना काळात शिक्षकांना अनेक अडचणी आल्याने आतापर्यंत निकालाचे ६० टक्के सुद्धा काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे, काही दिवस दहावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

निवडणूक कार्यालयाकडून नोटीस -

आगामी 2022 मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. त्यामुळे, मतदार यादी बनवण्याच्या कामामध्ये शिक्षकांची वर्णी लावण्यात आली आहे. मात्र, ही यादी बनवत असताना दहावीच्या विद्यार्थ्यांचे गुणांकाचे काम करण्याच्या सूचना राज्य मंडळाकडून देण्यात आल्या. त्यामुळे, बीएलओच्या कामावर असलेले शिक्षकांनी दहावीच्या निकालाला महत्व देत निकालाचे काम केले. या कालावधीत शिक्षकांना निवडणूक कार्यालयात जाणे शक्य झाले नाही. त्यामुळे, निवडणूक कार्यालयाकडून अनुपस्थित राहणार्‍या शिक्षकांना नोटीस पाठवण्यात आल्या. दहावीच्या गुणांकांचे काम मागील काही दिवसांपासून सुरू आहे. हे काम अद्याप पूर्ण झाले नसून त्यात काही त्रुटी पूर्ततेचे काम सुरू आहे. मुंबई महापालिकेकडे एक लाख कर्मचारी असताना पालिका निवडणुकीची यादी बनवण्यासाठी खासगी शाळेतील शिक्षकांना का जुंपले जात आहे? निवडणुकीच्या कामासाठी ऑनलाईन शिक्षणाला सुट्टी देऊन मुलांचे नुकसान का करावे, असा प्रश्नही शिक्षकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

हेही वाचा - केंद्रीय कृषी कायद्यात सुधारणा करण्यासाठी विधानसभेत तीन नवे विधेयक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.