ETV Bharat / city

CM Meeting With Shiv Sena MPs : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची शिवसेना खासदारांसोबत तातडीची बैठक, 'या' विषयांवर चर्चा होण्याची शक्यता - मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा वाद

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) महाराष्ट्र दिनी औरंगाबादला सभा घेऊन सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करणार आहेत. त्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Leader of Opposition Devendra Fadnavis ) हे देखील १ मे रोजी सभा घेऊन आघाडी सरकारची पोलखोल करणार आहेत. भाजपची सभा पुण्यात होणार आहे. तर दुसरीकडे किरीट सोमैयांकडून आरोपांचे सत्र सुरू आहे. हिंदुत्व, केंद्रीय कारवायांना सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील मुंबईत सभा घेणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे.

Chief Minister Uddhav Thackeray
शिवसेना खासदारांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत तातडीची बैठक
author img

By

Published : Apr 29, 2022, 12:19 PM IST

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून लाऊडस्पीकर ( Loudspeaker ), हनुमान चालीसा ( Hanuman Chalisa ) अशा अनेक कारणांमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी शिवसेना खासदारांची तातडीची बैठक ( CM Thackeray Meeting with Shiv Sena MPs) बोलावली आहे. केंद्रातील मोदी सरकारला घेरण्याची रणनीती या बैठकीत आखली जाणार असल्याची शक्यता आहे. त्यासोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंदूत्वाच्या मुद्यावर आक्रमक होत आहे, त्यावरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री ठाकरेंचे ( CM Uddhav Thackeray ) खासगी निवासस्थान मातोश्री येथे शुक्रवारी दुपारी 1 वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

केंद्राविरोधात आक्रमक व्हा

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांनी कोविडसंदर्भात बोलावलेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत बिगर भाजपशासित राज्यात ( Non-BJP states ) इंधनाचे दर जास्त असल्याचा आरोप केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. मात्र आता केंद्र सरकारला घेरण्याच्या हालचाली शिवसेनेने सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना खासदारांची तातडीची बैठक बोलावण्यात असून केंद्र सरकार सरकारकडे असलेली महाराष्ट्राची थकबाकी, पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर ( Petrol and diesel price hike ) यावर चर्चा होणार असून केंद्राविरोधात आक्रमक पवित्रा घेण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उद्धव ठाकरे देणार प्रत्युत्तर

गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि मनसेसह इतरही विरोधी पक्षांकडून शिवसेनेवर सातत्याने टीका केली जात आहे. दुसरीकडे लाऊडस्पीकर, हनुमान चालीसा आणि राज्यातील अन्य विषयांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केले जात आहे. अशातच राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी तीन मेपर्यंतचा अल्टिमेटम मनसेने दिला आहे. राज्य सरकार आणि खास करून उद्धव ठाकरे यांच्यावरही राज यांनी हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे लवकरच त्याचा समाचार घेणार आहेत. त्या अनुषंगाने आज होणाऱ्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) महाराष्ट्र दिनी औरंगाबादला सभा ( MNS Rally in Aurangabad ) घेऊन सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करणार आहेत. त्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Leader of Opposition Devendra Fadnavis ) हे देखील १ मे रोजी सभा घेऊन आघाडी सरकारची पोलखोल करणार आहेत. भाजपची सभा पुण्यात होणार आहे. तर दुसरीकडे किरीट सोमैयांकडून आरोपांचे सत्र सुरू आहे. हिंदुत्व, केंद्रीय कारवायांना सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील मुंबईत सभा घेणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे.

हेही वाचा : BMC Work Going Slow Swing : 'प्रशासकांच्या कार्यकाळात पालिकेचे कामकाज संथ गतीने! 368 प्रस्ताव रखडले', आयुक्त म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.